नांदेड(प्रतिनिधी)-ज्यांना एखादी सवय लागते तीच त्यांची ओळख होत असते आणि ती सवय पुर्ण झाली नाही तर मनात बेचैनी होते. असाच काहीसा प्रकार जुगार अड्डा चालवणाऱ्या “बिल्डर’चा झाला आहे. गोदावरी नदीचा काठ सोडून “बिल्डर’आता मालकी ऐवजी पैनगंगेच्या काठावर भागिदारीमध्ये (पार्टनशिप) 52 पत्यांचा जुगार अड्डा सुरू केला आहे. तरी पण तो भाग नांदेड जिल्ह्यातच आहे.
आपल्या हातांमध्ये 10 अंगठ्या घालून रक्तदान शिबिराचे आयोजन करून मी किती सामाजिक व्यक्ती आहे याचा आव आणला होता. परंतू वास्तव न्युज लाईव्हने त्याचा तो खोटारडे पणा मागील बातम्यांमध्ये उघड केल्यानंतर नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा काठ सोडून “बिल्डर’ने आता पैनगंगेच्या काठाजवळ, हदगाव-उमरखेड रस्त्यावर असलेल्या टोलनाक्यासमोर भगवान महाकालच्या दाराच्या समोरच्या भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यात भागिदारी करून आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे.
“बिल्डर’ला भागिदार घेण्यामध्ये त्या जुगार अड्ड चालकांचा फायदाच आहे. कारण जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांचा जास्त विश्र्वास “बिल्डर’वर आहे. म्हणून ग्राहक आणण्याचे काम “बिल्डर’करतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विविध भाग होतात. त्यातला एक भाग “बिल्डर’ला मिळणार आहे. कधी काळी मालक असलेल्या “बिल्डर’ला आता दुसऱ्याच्या जुगार अड्ड्यामध्ये भागिदार व्हावे लागत आहे. कारण त्यामधून येणारे उत्पन्न याची सवय लागली आहे आणि ती सवय त्याची ओळख बनली आहे.
पत्रकारोंना माहित आहे काय? पत्रकार करतो जुगारअड्ड्यांचे कलेक्शन
नांदेड जिल्ह्यात जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या या 52 पत्यांच्या जुगार अड्यांवर नांदेडमधील स्वत:ला नामांकित, दुधाने अंघोळ केलेला दाखविण्याचा प्रयत्न करणारा एक पत्रकार सिमेलगतच्या देगलूर या गावामध्ये नांदेड जिल्ह्याच्या आणि इतर जिल्ह्यांच्या सिमेलगत चालणाऱ्या या जुगार अड्ड्यांमधून सर्वच पत्रकारांना विक्री करून हा पत्रकार कलेक्शन करतो. त्या जुगार अड्डेवाल्यांना एका पत्रकाराचे नाव आणि दुसरेच अडनाव असे सांगून जवळपास 2 लाख रुपये वसुल करतो.यदा कदा कोणी त्या तालुक्याचा सोडून दुसरा पत्रकार गेला तर जुगार अड्डा चालक वसुली करणाऱ्या पत्रकाराला फोन करतो. तेंव्हा त्या जुगार अड्डा चालकाला मुर्ख बनवले जाते आणि अडनाव तेच असेल तर नाव बदलून सांगतो, कधी नाव तेच सांगतो तर अडनाव बदलून सांगतो. या देगलूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्राजवळच हा जुगार अड्डा आहे. इतर पत्रकारांना त्या 2 लाखांपैकी काय देतो की, नाही हे माहित नाही पण त्याचा हिशोब जुगार अड्डा चालक महिन्याच्या पहिल्या 5 तारेखपर्यंतच करतात अशी खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.