डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी  

  • 49 रुग्णांवर शस्त्रक्रिया 
  • 857 रुग्णांवर उपचार
  • रुग्णालयामध्ये भरती रुग्ण722

नांदेड, (जिमाका)- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 857  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 722 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 9 ऑक्टोंबर ते  10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  149  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात  7 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नवजात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 6 (पुरुष जातीचे 2, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे.

गत 24 तासात एकूण 49 शस्त्रक्रिया झाल्या. यात 40 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 9 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 26  प्रसुती करण्यात आल्या. यात 11  सीझर होत्या तर 15 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *