साक्षी रोकडे व रोहिणी सुर्यवंशी यांची राष्ट्रीय बॉल बडमिंटन स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्यास रौप्य पदक
अर्शद शेख हे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक

नांदेड(प्रतिनिधी)-दिनांक 15 ते 18 ऑक्टोबर 2023 दरम्यान भिलाई – छत्तीसगड येथे होणाऱ्या 42 व्या ऑल इंडिया सब ज्युनिअर नॅशनल बॉल बडमिंटन चम्पियनशीप 2023-24 साठी लातूर जिल्हा संघातील साक्षी रोकडे व रोहिणी सुर्यवंशी या दोन खेळाडूंची निवड झाली आहे तसेच लातूर जिल्ह्याचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू अर्शद शेख यांची महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचे राज्य महासचिव अतुल ईंगळे यांनी जाहीर केले.
दिनांक 06 ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान गडचिरोली येथे संपन्न झालेल्या 42 व्या महाराष्ट्र स्टेट सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 37 संघानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने अहमदनगर, नागपुर, वर्धा या संघाचा साखळी फेरीत पराभव करून उप उपांत्य सामन्यात यजमान गडचिरोली संघाचा पराभव केला. उपांत्य फेरीत गतविजेत्या बलाढ्य पुणे महानगर संघाविरूद्ध विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीत अटीतटीच्या सामन्यात पुणे जिल्हा विजेता ठरला व लातूर जिल्हा उपविजेता ठरला.
लातूर जिल्हा संघात साक्षी रोकडे, रोहिणी सुर्यवंशी, अनुराधा सुर्यवंशी , नंदिनी, स्नेह, तन्वी, संस्कृती, अपेक्षा , स्वराली यांचा समावेश होता तर संघाचे प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू मनीषा सुर्यवंशी व अर्शद शेख हे होते.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने निवड समितीचे डॉ.हरीश काळे, सौ. मंजुषा खापरे, संजय महाजन, अंकित भोईर, रिंकु पापडकर यांनी साक्षी व रोहिणी यांची भिलाई छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली.
महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंना राज्य सचिव अतुल ईंगळे, अध्यक्ष पी.के.पटेल, कार्याध्यक्ष डी.एस.गोसावी, कोषाध्यक्ष विजय पळसकर, राजाभाऊ भंडारकर, जिल्हा सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू असद शेख,फैजान शेख, अध्यक्ष ज्ञानोबा भोसले (संचालक किलबील नॅशनल स्कुल), संगमेश्वर निला, मुख्याद्यापक सुनिल शिंदे(ज्ञानवर्धिनी विद्यालय), मुख्याद्यापिका आशा रोडगे (संत ज्ञानेश्वर विद्यालय), प्रिती शहा (किडीज इन्फो पार्क) विलास यादव , तानाजी कदम, अभिजीत बी.एल. राष्ट्रीय पातळीवरील स्टार ऑफ इंडिया नईम शेख, अकबर पठाण, अदनान शेख, अय्युब जहागीरदार, तबरेज लाला, शेख नूरभाई, संजय उभारे व असद स्पोर्टस्‌ अकडमीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *