नांदेड(प्रतिनिधी)-शाळा सुरू करण्यासाठी एक भुखंड लाटून तो भुखंड परस्पर विक्री करणाऱ्या दोघांविरुध्द ईतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. भुखंडाची किंमत 45 लाख 70 हजार 200 रुपये आहे.
सिध्दी खालेद हैदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 एप्रिल 2013 ते 20 सप्टेंबर 2023 दरम्यान उमर कॉलनी देगलूर नाका येथील त्यांचा एक भुखंड मोहम्मद सुलतानोद्दीन कुरेशी, मोहम्मद शकलोद्दीन कुरेशी या दोघांनी शाळा सुरू करायची म्हणून घेतला. त्या भुखंडावर बॅंकेचे कर्ज उचलले आणि याही पुढे जात या दोन्ही कुरेशीनीं सिद्दी खालेद यांचा भुखंड परस्पर विक्री केला. या भुखंडाची किंमत 45 लाख 70 हजार 200 रुपये आहे.
इतवारा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार मोहम्मद सुलतानोद्दीन कुरेशी आणि मोहम्मद शकीलोद्दीन कुरेशी या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 317/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ईतवाराचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण हे करीत आहेत.
शाळा सुरू करण्याच्या नावाने 45 लाखांचा भुखंड परस्पर विक्री