नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या वादातून चुलत्याने इतरांसह आपल्या पुतण्याचा खून केल्याची घटना मरणाऱ्याच्या आई-वडीलांसमक्ष घडली. मरणारा युवक बी.ए.प्रथमवर्षाचा विद्यार्थी होता. चार मारेकरी दोन दिवस पोलीस कोठडीत आहेत.
रमेश गोविंद राठोड रा.भोजू तांडा ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचा मुलगा विनोद रमेश राठोड (20) हा बी.ए. प्रथम वर्षाची परिक्षा देवून घरी आला आणि घराच्या बाहेर असलेल्या बाजेवर झोपला होता. त्यावेळी माझे भाऊ धोंडीबा देवला राठोड, पिंटू उर्फ अंकुश बळीराम राठोड, काशाबाई धोंडीबा राठोड, कल्पना धोंडीबा राठोड या सर्वांनी जुना वाद लक्षात ठेवून रमेश गोविंद राठोड, विनोद रमेश राठोड यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकली आणि धोंडीबा देवला राठोडने आपल्या हातातील चाकू विनोद रेश राठोडच्या छातीत खुपसून त्याचा खून केला. दुसरा मुलगा कपील रमेश राठोड हा सोडविण्यासाठी गेला असतांना धोंडीबा देवला राठोडने आपल्या हातातील चाकूने त्याच्या हातातील चाकूने कपील राठोडच्या डाव्या मनगटावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार घडला तेंव्हा रमेश गोविंद राठोड आणि त्यांच्या पत्नी अर्थात मयत विनोदच्या आई आपल्या मुलाला सोडण्यासाठी आक्रोश करत होत्या.
मुक्रामाबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार दोन महिलांसह चार जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 506, 34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 204/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुक्रामाबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गजानन कागणे यांच्याकडे देण्यात आला आहे. विनोद राठोडचे चार मारेकरी पोलीसांनी पकडले असून सध्या ते दोन दिवस पोलीस कोठडीत आहेत.
आई-वडीलांसमोर मुलाचा खून करणारे चार मारेकरी पोलीस कोठडीत