नांदेड(प्रतिनिधी)-नवजात बालकाला दवाखान्यात भरती करून घेत नाही असे म्हणणाऱ्या दवाखान्याविरुध्द कार्यवाही करावी आणि त्या दवाखान्याची नोंदणी रद्द करावी अशी मागणी करणारे निवेदन गौतम जैन यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.
गौतम जैन यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे जन्म घेतलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास आहे म्हणून अतिदक्षता विभागात भर्ती केले होते. परंतू त्या दवाखान्याची परिस्थिती पाहुन मला त्या दवाखान्यात माझे बाळ उपचारासाठी ठेवायचे नाही असे म्हटल्यानंतर दवाखान्यातील लोकांनी माझ्या बाळाच्या श्र्वास नलिका काढून फेकल्या. तसेच ते माझे बाळ 40 मिनिटे बिना श्वास निलिकेच्या तेथे ठेवले म्हणजे माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न झाला याची तपासणी व्हावी. दवाखान्यात माझे बाळ ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली नाही. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मग कोणत्या आधारावर औषधी मागवली. जन्मलेल्या बाळाचे औषध दवाखान्याची चिठ्ठी नसेल तर कोणताही मेडिकल औषध देत नाही मग त्या मेडिकलवाल्याने औषध कसे दिले याची चौकशी व्हावी. प्रसुती अगोदर तीन ते चार प्रकारच्या सोनोग्राफी करण्यात आल्या. त्यात माझ्या बाळाच्या सर्व तपासण्या चांगल्या असतांना बन्नाळीकर दवाखान्याच्या डॉक्टरला कसे कळले की, माझ्या बाळाला श्वास घेण्यास समस्या आहे.त्यांनी साखरेची तपासणी(शुगर) केली. त्यात लो शुगर असल्याचे सांगितले. दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये तीच तपासणी सुव्यवस्थीत होती. डॉक्टरांनी एकदा पण तपासणी न करता 1 हजार रुपये फिस घेणे योग्य आहे का?, डॉक्टर तपासणी फिस 300 रुपये असतांना 1 हजार रुपये कसे घेण्यात आले. माझ्या बाळाची तपासणी फिस दिली नाही म्हणून त्याच्या तपासणीत उशीर केला. दवाखान्याची परवानगी घेतांना विहित क्षेत्राची जागा असेल, वाहनतळ असेल तरच परवानगी मिळते अनेक एनओसी लागतात या बन्नाळीकर दवाखान्याकडे नियमाप्रमाणे परवानगी आहे काय ? अशी विचारणा निवेदनात केली आहे.जे बिल देण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही प्रकार नव्हता त्याची तपासणी व्हावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन गौतम जैन यांनी जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांना दिले आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही असे गौतम जैन यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले.
बन्नाळीकर हॉस्पीटलची परवानगी रद्द करण्यासाठी गौतम जैनचे निवेदन