नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकाविरुध्द तक्रार देणारे सन्मानिय श्री.राजू दत्तगिर गिर हे महान पत्रकार नॉट रिचेबल झाले आहेत का बर? वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकांविरुध्द दाखल केलेल्या गुन्ह्यात पुरावे कोण देईल? राजू गिरी या परत लवकर आणि पुरावे द्या तरच वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकांविरुध्द कार्यवाही होईल ना?
दि.09 ऑक्टोबर रोजी रात्री वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक प्रकाश सुर्यतळ आणि इतर तीन अशा चार जणांविरुध्द टी.व्ही.9 चे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी सन्माननिय श्री.राजू दत्तगिर गिरी यांनी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तो गुन्हा दाखल झाला.त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 419, 500 आणि 34 जोडण्यात आली आहेत. वास्तव न्युज लाईव्ह, भारतातील कोणताही व्यक्ती किंवा वास्तव न्युज लाईव्हचे संपादक हे कायद्यापेक्षा कधीच मोठे नाहीत. परंतू कायद्याची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात आणि गुन्हा दाखल करुन सन्माननिय राजू दत्तगिर गिरी हे नॉट रिचेबल झाले आहेत.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसापुर्वी नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रात सन्माननिय असलेले टी.व्ही.9 या संकेतस्थळाचे पत्रकार राजू दत्तगिर गिरी हे नॉट रिचेबल झाले आहेत. मग पोलीसांना पुरावे कोण देईल. जॉयनिस्ट-स्वर्ग (हिबु्र भाषेतील शब्द) या प्रमाणे राजू दत्तगिर गिरी हे आंध्र प्रदेशातील गोविंदाच्या दर्शनाला गेले आहेत. पण गोविंदा फक्त पैसे देतो तो इभ्रत देत नाही. नांदेड जिल्ह्यातील काही नेते दर सहा महिन्याला गोविंदाकडे जात होते. गोविंदाच्या हुंडीमध्ये 2 कोटी रुपये टाकत होते. तरीपण साडे तीन वर्ष ते पलंगावर पडून सडून सडून मरण पावले. मग राजू दत्तगिर गिरीला इभ्रत कशी मिळेल. राजू गिरीने त्या नेत्यापेक्षा 0.5 टक्के रक्कम सुध्दा आपल्या जीवनात कमवली नसेल. मग त्याला गोविंदा इभ्रत कशी देईल?
राजू दत्तगिरी गिरी आमच्याकडे आता आपण दवाखान्यात मृत्यूचा वणवा पेटल्यानंतर काय केले याची सुध्दा माहिती उपलब्ध आहे. लिहावी काय ती? आपल्या संपादकांना ती पाठवावी काय? प्रशासनाकडे द्यावी काय? जाऊ द्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहु-फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे व्यक्ती आहोत भिकारी नव्हे. तेंव्हा आम्हाला शिकवलेल्या आमच्या महापुरुषांनी त्या विचारांवर विद्रोह करावा काय असे जर तुम्हाला वाटेत असेल तर आम्ही त्यासाठी सुध्दा तयार आहोतच!
संबंधित बातमी….
https://vastavnewslive.com/2023/10/11/नांदेड-जिल्ह्यात-टी-व्ही-9/