नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीचे डोके वारंवार ग्रेनाईट या दगडाच्या उंबरठ्यावर मारून तिचा खून करणाऱ्या नवऱ्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. जाधव यांनी 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कांडली परतवाडा ता.अचलपूर जि.अमरावती येथील दिपेश सदानंद कुरोटीया (30) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्यावेळेस महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटीमध्ये त्यांची बहिण दिपा शिवशक्तीसिंह गहलोत यांना त्यांचे पती शिवशक्तीसिंह प्रतापसिंह गहलोत यांनी बाथरुमजवळ नेऊ तेथे असलेल्या ग्रेनाईट दगडाच्या उंबरठ्यावर दिपा यांचे डोके वारंवार आपटून त्यांचा खून केला आहे. या तक्रारीवरुन शिवभक्तीसिंह गहलोत (ठाकूर) (40) यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 498(अ), 504 प्रमाणे गुन्हा क्रमांक 332/2023 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास विमानतळचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने हे करत आहेत.
16 फेबु्रवारी 2016 रोजी दिपाचे लग्न शिवशक्तीसिंह गहलोत यांच्यासोब झाले होते. सहा वर्षांच्या संसारात या दोघांनी आराध्या (वय 6) आणि एक महिला (एक महिन्यांचा) अशा दोघांना जन्म दिला. 12 ऑक्टोबरच्या रात्री हा प्रकार घडला. आम्ही येवून पाहिले असता दिपाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखमा दिसत होत्या.
आज पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने आरेापी शिवशक्तीसिंह गहलोतने पोलीसांना पुरावे मिळू नयेत म्हणून प्रयत्न केलेला दिसतो त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. असे सांगून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश पी.एस.जाधव यांनी पत्नीचा खून करणाऱ्या शिवशक्तीसिंहला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
पत्नीचा खून करणाऱ्या नवऱ्याला सहा दिवस पोलीस कोठडी