खून का बदला खून; वडीलांच्या खूनाचा बदला मुलांंनी 14 वर्षांनी घेतला

नांदेड(प्रतिनिधी)-खून का बदला खून या न्यायाने 2009 मध्ये झालेल्या आपल्या वडीलांच्या खूनाचा बदला 2023 मध्ये आज धनेगाव येथे रस्त्यावर एका व्यक्तीचा खून करून घेतला आहे. आज सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास धनेगाव येथे आपल्या वडीलाच्या मारेकऱ्याचा खून केला आहे.
आज सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास शेख मुजीब शेख महेबुब हा आपल्या दुचाकीवर देगलूर नाका येथून धनेगावच्या पलिकडे जात असतांना त्याच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वारांनी त्याच्यावर हॉकीस्टीकच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्यात शेख मुजीब रस्त्यावर खाली पडला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तुरंत घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमीनीवर खाली पडलेल्या मुजीबला दवाखान्यात पाठविले असतांना डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली.
सन 2009 मध्ये नासीर नावाच्या एका व्यक्तीचा खून झाला होता. आणि तो खून शेख मुजीबने केला होता म्हणून नासेरच्या मुलांनी आज शेख मुजीबचा खून केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे अशा प्रकारे खून का बदला खून ही पध्दत राबवून समाजात दहशत माजविणाऱ्यांनी पुन्हा उधान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *