नांदेड(प्रतिनिधी)- काल सायंकाळी मराठवाडा बारसमोरच्या रस्त्यावर एक मृतअवस्थेतील अनोळखी माणुस सापडला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या संदर्भाने सध्या आकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी तो आकस्मात मृत्यू नसून खूनच आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. अनोळखी मयताला कोणी ओळखत असेल तर त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
काल दि.20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास राजकॉर्नर ते किसान चौक जाणाऱ्या रस्त्यावर मराठवाडा बार समोर उलट दिशेला एक माणुस पडलेला होता. त्याच्या जखमा पाहुन वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली.पोलीसांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असतांना त्याचा मृत्यू झाला. भाग्यनगर पोलीसांनी या संदर्भाने सध्या आकस्मात मृत्यू दाखल केला आहे. उर्वरित वैद्यकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्या संदर्भाचा गुन्हा नोंद होईल. छायाचित्रात दिसणारा अनोळखी मयत व्यक्ती हा 35 ते 40 वर्षाचा असेल. याला मारणाऱ्या व्यक्तीचे नाव चव्हाण आहे असे काही जण सांगतात. पण तो चव्हाण कोण याचा काही शोध अद्याप लागलेला नाही. छायाचित्रातील व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी या अनोळखी मयत व्यक्तीबद्दलची माहिती पोलीसांना द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला ; घातपात की आकस्मात मृत्यू?