जिंतूर(प्रतिनिधी)-जिंतूर बसस्थानकावर चार जणांनी एकाला लुटल्याप्रकरणी जिंतूर पोलीसांनी अत्यंत जलदगतीने त्याचा शोध लावून चारही आरोपींना गजाआड केले आहे.
दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता संतोष नामदेव बेले हे आपलया बहिणीला भेटण्यासाठी साखरतळा ता.जिंतूर येथून आले. जिंतूर येथे मुक्काम करून दाभा ता.औंढा येथे परत जाण्यासाठी जिंतूर बसस्थानकावर थांबले होते. शौचालयाकडे गेल्यानंतर चार अनोळखी माणसांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 3 हजार 800 रुपये रोख रक्कम व एक मोबाईल लुटला. जिंतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 444/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 506 नुसार दाखल झाला.
परभणीच्या पोलीस अधिक्षक आर.रागसुध्दा, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनात जिंतूरचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सय्यद, पोलीस अंमलदार कांबळे, घोडके, चव्हाण, सावंत, मेतके आणि गृहरक्षक दलाचे जवान राठोड आणि शर्मा यांनी मेहनत घेवून संतोष बेले यांना लुटणारे शेख वजिर उर्फ साईबिराम (35) रा.येलदरी ह.मु.हिदायतनगर जिंतूर, संतोष कांता खाटीकमारे (21) रा.हुतात्मास्मार जिंतूर, प्रशिक उर्फ गेंदे रुद्र वाकडे (23) रा.येलदरी रस्ता जिंतूर, जीवन दिनकर सानप (19) रा.जिंतूर या चौघांना पकडून त्यांच्याकडून 2 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सध्या हे चारही दरोडेखोर पोलीस कोठडीत आहेत.
जिंतूर पोलीसांनी काही तासात चार दरोडेखोर पकडले