

नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे पासूनच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व आंबेडकरी बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यांनी दिलेल्या 22 प्रतिक्षाचे सामुहिक वाचन केले.
आज धम्मचक्र प्रवर्तन दिन यानिमित्त सकाळपासूनच अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी गर्दी केली. डॉ.बाबसाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी 7 वाजता महावंदना हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात हजारो अनुयायी सहभागी झाले होते. दिवसभर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा कार्यक्रम सुरू होता. अनेक आंबेडकर अनुयायी दर्शनासाठी येत होते. प्रत्येक बौध्द विहारात पंचरंगी ध्वज उभारुन वंदना घेण्यात आली. त्यात सर्व वृध्द, महिला, युवक -युवती, बालक-बालिका सहभागी झाल्या. अनेक ठिकाणी खिरदानाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस दलातील असंख्य अधिकारी आणि असंख्य पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांनी मेहनत घेवून कोणत्याही धार्मिक कार्यक्रम अशांतता होणार नाही यासाठी भरपूर मेहनत घेतली.