बाफना येथील भुखंड माफियांवर कार्यवाही करण्याचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-बाफना टी पॉईंट जवळील जवळपास 50 एकर पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण करणाऱ्या दीपलक्ष्मी डेव्हलपर्स विरुध्द चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर उपजिल्हाधिकारी सामन्य यांनी तहसीलदार नांदेड यांना दिले आहेत.
नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक 7345/23 दाखल केली होती. त्यांच्या मागणीनुसार सर्व्हे नंबर 5, 7, 8, 23, 68, 69, 16, 13, 21, 25, 27, 35, 86 आणि 96 हे मुळ सरकारच्या मालकीचे आहेत. या सर्व जमीनीचा महसुल गोळा करण्यासाठी पट्टेदार या सदराखाली ही जमीनी गुरूद्वारा बोर्डाला देण्यात आली आहे. परंतू काही भुखंड माफियांनी शासनाच्या नियमांमधील त्रुटींचा फायदा घेत या मोठ्या भुखंडांचे श्रीखंड करण्याचा विचार केला आणि तेथे सर्व जमीनीला टीनशेड लावून ही जागा दिपलक्ष्मी डेव्हलपर्स यांच्या ताब्यात आहे आणि ती सबलिज आधारे आहे असे एक बोर्ड लावून लिहिले आहे.
उच्च न्यायालयातील याचिका या आदेशासह परत झाली की, संबंधीत सक्षम अधिकाऱ्याकडे यासाठी दाद मागावी. त्यानंतर मनजितसिंघ जगनसिंघ यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात 17 जुलै 2023 रोजी पत्र देवून अतिक्रमण धारकांविरुध्द कार्यवाहीच मागणी केली. त्या पत्राच्या आधारावर तहसीलदार नांदेड यांना 20 ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार सर्व मुळ कागदपत्रांचे अवलोकन करून अभिलेखाची तपासणी करावी आणि आजच्या अतिक्रमण धारकांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 च्या कलम 53 नुसार चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *