नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलचे पिडीत शिक्षक न्याय मिळत नाही म्हणून कंटाळले असून आता त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांना दिला आहे. 31 ऑक्टोबरपासून हे सहा शिक्षक नागार्जुना पब्लिक स्कुलसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
मागील 13 ते 20 वर्ष नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये आपल्या सेवा देणारे 6 शिक्षक चांगले काम करत असतांना काही कायदेशीर व न्याय मागण्या शाळा व्यवस्थापन आणि जिल्हा परिषदेकडे मागणी केल्यानंतर 13 जानेवारी 2023 रोजी शाळेच्या हिशोबनिसाने रिफ्रेन फ्रॉम सर्विस असे पत्र देवून त्यांना शाळेच्या कामावरून कमी केले. हा प्रकार एमईपीएस कायदा 1981 नुसार चुकीचा आहे. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या स्तरावर न्याय मिळावा म्हणून लढत आहोत. आता शाळेने आमच्या खात्यावरुन आमच्या वेतनातून काढून घेतलेली दरमहा रक्कम आम्हास परत करावी तसेच आमहला वेतन आयोगाप्रमाणे वेतन भत्ते व इतर भत्ते देण्यात यावी अशी मागणी आज दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.शाळेतील शिक्षकांच्या पाल्यांना त्या शाळेत शिक्षण मोफत होते. परंतू पिडीत शिक्षकांच्या पाल्यांकडून मागितली जाणारी फिस रद्द करावी आमच्या पीएफ खात्यामध्ये शाळा व्यवस्थापनाने एक हिस्सा भरणे अपेक्षीत होेते. परंतू दोन्ही शेअर शिक्षकांच्या वेतनातूनच भरले जात होते. ती रक्कम आम्हाला परत करण्यात यावी. शाळेतील महिला शिक्षकांना आजपर्यंत कधीच प्रसुती रजा दिलेली नाही. तेंव्हा शाळा व्यवस्थापनाने प्रसुती झालेल्या महिला शिक्षकांची वेतन रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी.
शाळेतील शिक्षकांना रजा मिळणेबाबतचे नियम आहेत. त्या नियमानुसार रजा मिळाव्यात. शासनाने नियमित वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला वेतन व इतर भत्ते द्यावेत आणि शिक्षकांची मान्यता जिल्हा परिषदेकडून करून घ्यावी. सौ.निशा गुडमेवार यांचे थकीत वेतन शाळा व्यवस्थापनाने त्यांच्या खात्यावर जमा करावे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी 1 मार्च 2023 रोजी शिक्षकांना काढून न टाकण्याबाबत सक्त ताकीद दिलेली आहे. म्हणजे शिक्षकांना शाळेत रुजू करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. आम्हाला रिफ्रेन केल्यापासून आमचे संपूर्ण वेतन आम्हाला द्यावे आणि शाळेत रुजू करून घ्यावे यासाठी आम्ही सर्व सहा शिक्षक 31 ऑक्टोबर 2023 पासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास सुरूवात करणार आहोत.
या निवेदनाच्या प्रति शिक्षकांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी नांदेड, शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड यांना दिल्या आहेत. या निवेदनावर पिडीत शिक्षक अतुल राजूरकर, सौ.निशा गुडमेवार, मंगला वाघमारे, नामदेव शिंदे, बालाजी पाटील आणि अविनाश चमकुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागार्जुना पब्लिक स्कुलच्या पिडीत शिक्षकांनी आता घेतला आमरण उपोषणाचा मार्ग