नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका बाहेर राज्यातील व्यक्तीकडून 21 तलवारी आणि 11 खंजरी असा हत्यारांचा साठा जप्त केला आहे. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दि.27 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्तीच्या वाटेवर असलेल्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार नगीनाघाट परिसरात एका गाड्यात हत्यारे लपवून ठेवलेली आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखा पथकाने नगीनाघाट जवळ दर्शनसिंघ लाभसिंघ (35) रा.बंगीकला ता.तलवंडी (साबोली) जि.भटींडा राज्य पंजाब याच्या गाड्यातून 21 तलवारी व 11 खंजरी असा एकूण 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडुरंग माने, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, रणधिरसिंह राजबन्सी, विलास कदम, गजानन बैनवाड, किरण बाबर, गंगाधर घुगे, हनुमानसिंह ठाकूर यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने पकडला मोठा शस्त्रसाठा