नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने एका 26 वर्षीय युवकाकडून एक अग्निशस्त्र(गावठी पिस्तुल) आणि एक जीवंत काडतूस पकडला आहे.
दि.27 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाच्या मिरवणूका सुरू असतांना शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख मिलिंद सोनकांबळे यांना एक माहिती मिळाली. त्यांनी माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे यांना दिली. त् यानंतर पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, लिंबाजी राठोड, अंकुश लंगोडे आणि दत्ता वडजे यांनी रोड नंबर 26 जवळ सागर उर्फ मुन्ना शामसिंह परमार (28) या ऍटो चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल 20 हजार रुपये किंमतीचे व एक जीवंत काडतूस 2 हजार रुपयांचा असा 22 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर परमारविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 350/2023 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्यासह त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल व एक जीवंत काडतूस पकडले