नांदेड(प्रतिनिधी)-मौजे किवळा ता.लोहा येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीबद्दल परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात 11 आरोपींची नावे आहेत तर दुसऱ्या गुन्ह्यात 12 आरोपींची नावे आहेत.
दि.26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास मौजे किवळा जाणाऱ्या रस्त्यावर टर्के या कुटूंबियांमध्ये पुर्वीच्या जमीनीच्या वादातून भांडण झाले. त्यात दगड, विटा, काठी, खंजीर यांचा वापर करून दोन गटांनी एकमेकांवर हल्ला केला. त्यामध्ये विश्र्वनाथ संजय टर्के यांच्या तक्रारीवरुन अच्युत टर्के, प्रभाकर टर्के, दत्तराम टर्के, अखिलेश टर्के, महेश उर्फ बंटी टर्के, दिगंबर दादाराव टर्के, ओम गोविंद टर्के यांचे मित्र, हनुमंत गाडे, कृष्णा शाहुराज ढगे, कृष्णा बारोळे, सचिन गोरखनाथ मोरे या 11 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
या विरुध्द प्रभाकर दिगंबर टर्के यांनी दिलेल्या तक्रारीत विश्र्वनाथ संजय टर्के, साईनाथ दयानंद टर्के, अश्र्विन विजय टर्के, विजय शंकर टर्के, शिवाजी शंकर टर्के, साईनाथ सुभाष टर्के, नवनाथ सुरेश टर्के, संजय बालाजी टर्के, सुरेश बालाजी टर्के, बिजू शंकर टर्के, दिगंबर शंकर टर्के आणि आदिनाथ बवन टर्के अशा 12 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 326 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले करत आहेत.
किवळा गावात दोन गटात हाणामारी