नांदेड-नागपुर बसला अज्ञातांनी पेटविले

पैनगंगा नदीवरिल विदर्भ-मराठवाडा सीमेवरील घटना  
बसचे ७३ प्रवासी सुखरूप, ३२ लाखाचे नुकसान 
हदगांव(प्रतिनिधी)-नांदेड येथून नांदेड आगाराची रातराणी बस रात्री नऊ वाजता नागपूर जाण्यासाठी खचाखच भरून प्रवासी घेऊन निघाली. शुक्रवारी २७ ऑक्टोंबरच्या रात्री ११ : ३० च्या सुमारास विदर्भ-मराठवाडा सीमेवर उमरखेड हदगांव दरम्यान असलेल्या असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावर मधोमध रस्त्यात सात-आठ युवक  पाठलाग करित आलेल्या युवकांनी आडवली. सात-आठ अज्ञातांनी बस आडवुन काचा फोडल्या आणि प्रवाशांना खाली उतरुन पेट्रोल टाकुन बस जाळली.
 या मध्ये बसुन असलेले ७३ प्रवासी सुखरुप आहेत. मात्र बसचे सुमारे ३२ लाखाचे नुकसान झाले आहे. नांदेड येथून नागपूर जाण्यासाठी नांदेड आगाराचे बस चालक बापुराव नाईकवाडे (४२) रा. पानभोसी  आणि वाहक शिवाजी वाघमारे  हे बस क्र. एमएच २० सीजी ३१८९ हे प्रवासांना घेऊन येत होते. मध्येच गोजेगांव जवळील पैनगंगा नदीच्या पुलावर २४ – २५ वयोगटातील सात ते आठ युवकांनी माठीमागून दगड काठ्या घेऊन बसचा पाठलाग करुन बस पुलावर मधोमध थांबवीली. बसच्या काचा काठ्या व दगडाने  फोडुन नुकसान करत प्रवाशांना खाली उतरविले. संपूर्ण गाडीवर, टायरवर पेट्रोल टाकुन बस पेटविली. या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीसांनी धाव घेत उमरखेड नगर पालिकेकडिल अग्नीशमन दल नेऊन आग आटोक्यात आणली, पैनगंगा नदीवर पूल उभारण्याचे काम गावर हायवे प्रा. लि. कंपनी कडुन सुरु आहे. त्यां कामावरील कामगारांच्या मदतीने खाक झालेली बस त्या पुलावरून हटवून रस्याच्या बाजुला करण्यात आली. त्या नंतर सकाळी ३ वाजता हा राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. नेमकी बस कोणत्या कारणांमुळे जाळण्यात आली याचा शोध घेण्याचे काम उमरखेड पोलीस करत आहेत.
 बसचे चालक बापूराव नाईकवाडे ( ४२ ) रा. पानभोसी ता कंधार यांनी घटनेची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यावरून ठाणे अंमलदार शंकर पांचाळ यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि कलम १४३, १४७, १४८, ४२७, ३४१, ३३६ आणि सार्वजनिक मालमता नुकसान प्रकरणी कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे, सदर घटनेचा आढावा हदगांव आगाराचे प्रमुख आनंद धर्माधिकारी यांनी घेतला. अधिक तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक किशोर घोडेस्वार करित आहेत.
सदर बस पुलावर डाव्या बाजूने थांबवली असतांना अचानक झोपेतून उठून काही प्रवाशांनी परिस्थिती पाहून खिडकीतून उड्या मारल्या. परंतु सुदैवाने एकही प्रवासी नदीत पडला नाही. पुलाच्या कठड्यावर पडल्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले असल्याचे एका प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. नंतर उमरखेड आगारातून एक बस आणून प्रवाशांना नागपूर जाण्याची व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *