नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या धोरणाविरुध्द खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि बेरोजगारीकरणच्या विरोधात विरोधी संयुक्त कृती समिती नांदेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा फुले पुतळयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्य शासनाने दि.6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी पध्दतीने 85 संवर्गातील 138 उपसंवर्गातील कर्मचारी भरती करण्याचा निर्णय 18 सप्टेंबर 2023 राज्यातील 65 हजार शाळा दत्तक योजना या नावाखाली खाजगीकरण करणे आणि 14 हजार 783 शाळा बंद करून त्यांच्या समुहशाळा निर्माण करणे असा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शासनाने चुकीच्या पध्दतीने घेतलेला आहे. उपलमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाजगीकरणाचा शासन निर्णय रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली असली तरी अद्यापही तो निर्णय रद्द झाला नाही. हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील 3 लाख रिक्त पदे तात्काळ भरावीत, लोकसेवा आयोगामार्फत भर्ती प्रक्रिया सुरू करावी यासह अन्य मागण्याघेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधी संयुक्त कृती समितीने आक्रोश मोर्चा काढला होता. यामध्ये सुर्यकांत विश्र्वासराव, संजय शिप्परकर, उज्वला पडळवार, व्ही.आर.चिल्लरवार, प्रा.परशुराम येसलवाड, मोतीभाऊ केंद्रे, प्रा.संभाजी वडजे, विठ्ठल चव्हाण, तानाजी पवार यांच्यासह आदींचा सहभाग होता.