नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुकीच्या पराभवानंतर एका गटातील व्यक्तींनी मौजे सावरगाव कला ता.उमरी येथे एका व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
शामराव अमृतराव जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता दुर्गादेवी विसर्जन करून ते गावातील अवधुत बाबाराव जोगदंड यांच्या घराजवळ आले असतांना गंगाधर नारायण खांडरे, संतोश सुरेश जोगदंड, हरीदास खांडरे, संजय बळीराम खांडरे, मारोती लक्ष्मण अहिरे, आनंदा दिगंबर खांडरे या सहा लोकांनी ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या कारणावरुन शामराव जोगदंड यांच्यावर लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड याच्या सहाय्याने जबर मारहाण केली.
उमरी पोलीसांनी या तक्रारीनुसार सहा जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 323, 504, 506,143, 147, 148, 149 नुसार गुन्हा क्रमांक 300/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक कऱ्हे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ग्राम पंचायतच्या पराभवातून एकावर जिवघेणा हल्ला