नांदेड(प्रतिनिधी)- दि.25 ऑक्टोबर रोजी दोन जणांनी पती-पत्नीची स्कुटी अडवून त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचे दागिणे बळजबरीने हिसकावून नेले आहेत. हा प्रकार 20 ते 22 वयोगटातील दोन अज्ञात आरोपींनी केला आहे.
अश्र्विनी दिपक भंडारे यांच्या तक्रारीनुसार दि.25 ऑक्टोबर रोजी दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.2860 वर बसून ते आणि त्यांचे पती दुर्गा देवीचे विसर्जन करण्यासाठी झरी येथे गेले होते. तेथून परत येत असतांना असर्जन नाकाजवळ दोन अज्ञात 20 ते 22 वर्ष वयोगट असलेल्या युवकांनी त्यांच्या पाठीमागून येवून अश्र्विनी भंडारे यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे किंमत 50 हजार रुपयांचे गंठण बळजबरीने हिसकावून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
महिलेच्या गळ्यातील गंठण बळजबरी चोरले