नांदेड (जिमाका) – जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त 31 ऑक्टोंबर 2023 रोजी “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंगळवार 31 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता “राष्ट्रीय एकता दौडीचे” आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरवात महात्मा गांधी यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
Related Posts
वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना
नांदेड (जिमाका)- वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” अंतर्गत नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम…
आज नांदेड जिल्ह्यात एक पोलिस अंमलदार
नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात आज एका पोलिस अंमलदाराचा महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तसेच दुसरा पोलीस एका अपघातात…
२९१ दुकानांच्या तपासणीत ३२१ किलो प्लॅस्टीक जप्त आणि ७२ हजार ८०० दंड
नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिकेच्या पथकाने २९१ दुकानांना भेटी दिल्या त्यातील ११ दुकानांमध्ये सापडलेले ३२१ किलो प्लॅस्टीक जप्त केले आणि त्यांच्याकडून ६० हजार…