
नांदेड(प्रतिनिधी)- आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
आज सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांची जयंती आहे. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे आदींनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना श्रीकृष्ण कोकाटे यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. या कार्यक्रमात पोलीसांसह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि विनोद भंडारे यांनी केले.