नांदेड(प्रतिनिधी)-30 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास एका 24 वर्षीय युवकाचा खून अल राहत हॉस्पीटल समोरच्या सार्वजनिक रस्त्यावर, खुसरोनगर चुन्नाभटटी नांदेड येथे घडला आहे.
अब्दुल मोबीन अब्दुल रशिद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा मोहम्मद अरबाज अब्दुल मोबीन बागवान (24) यास मोहम्मद अलमास उर्फ बबलू अब्दुल गफुर याने कुत्र्या इकडे ये, तु माझा आदर करत नाहीस, तुला जगण्याचा काही हक्क नाही म्हणून लोखंडी खंजरी मोहम्मद अरबाजच्या पोटात खुपसून त्याचा खून केला आहे. इतवारा पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संंहितेच्या 302, 506 नुसार गुन्हा क्रमांक 338/2023 दाखल केला असून इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख असद अधिक तपास करीत आहेत.
देगलूर नाका परिसरात युवकाचा खून