बिलोली(प्रतिनिधी)- येथिल जिल्हा न्यायधीश १ तथा अति सत्र न्यायधीश बिलोली दिनेश ए. कोठलीकर यांनी आरोपी गंगाधर इरना कर्णे, वय ३० वर्षे , हणमनबू इरन्ना कर्णे, वय ४२ वर्षे, सौ. रेणुकाबाई हणमनाम कर्णे वय ३८ वर्षे, सर्व रा. नरंगल बु. ता. देगलूर, जि. नांदेड यांना कलम ३०२ मा. द. वि. अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दंड रु ५०,०००/- व दंड न भरल्यास ६ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, मयत गंगाधर इरनाक व मयताचे चुलत पुलने गंगाधर इस्ना कर्णे , हणमनल इरन्ना कर्णे यांच्यामध्ये शेतीच्या कमी जास्त कारणावरुन वाद भांडण होते, गावातील लोकानी जमीन मोजणी करून वाद मिटवण्याचा सल्ला दिला होता. व त्यानुसार मयत गंगाधर इरन्ना कर्णे यांनी जमीन मोजणीचे पैसे भारुन स्वतःची जमीन मोजली तेव्हा मयत गंगाधर इरन्ना कर्णे ची ९. गुठे जमीन आरोपी गंगाधर इरन्ना कर्णे कडे निघाली होती. तेव्हा गावातील पंच लोकानी ९ गुंठे जमीन परत दे असे समजुन सांगुन देखिल आरोपी यांनी ताब्यात दिली नाही व आम्ही शेत सोडत नाही तुम्ही जर शेतात आले तर तुम्हाला मारुन टाकतो अशी धमकी दिली होती.
दि. १९/०४/२०२० रोजी सकाळी साडे चार वाजता मयत गंगाधर इरन्ना कर्णे शेतात वखरणी करत होता व त्यांच्यासोबत मुलगा चंद्रकांत गंगाधर कर्णे व पत्नी रेणुकाबाई गंगाधर कर्णे कचरा वेचत होते. अंदाजे साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास वरील आरोपी गंगाधरना कर्णे, हणमनलू इरन्ना कर्णे, व सौ. रेणुकाबाई हणमनलू कर्णे, हातात कुन्हाड, कती काठी घेऊन आले वस्तु या शेतात का वखरतोस असे म्हणत मयत गंगाधर इरन्ना कर्णे ला गंगाधर याने कुन्हाडीने डोक्यात मारले व हणम कत्तीने मारत होता व रेखाबाई हातातील काठीने मारहाण करत होती तेव्हा मयत गंगाधर ची पत्नी व मुलगा मध्ये गेले असता केली. मयताच्या पत्नीचे केस धरून तिला खाली पाडून रेखाबाई मारत होती. थोडया वेळात गावातील लोक येत असलेले पाहुन सर्व जन निघुन गेले. त्यानंतर मयताच्या पत्नीने मयत गंगाधर इरन्ना कर्णे यास उपचार कामी सरकारी दवाखाना देगलूर येथे घेऊन गेले व तेथे इलाज चालू असताना कुन्हाडीने कत्तीने गंभीर मारहाण झालेली असल्यामुळे मयत गंगाधर इरन्ना कर्णे यांचा मृत्यू झाला. मयताची. पत्नी सौ. रेणुकाबाई गंगाधर कर्णे हिने दिलेल्या तक्रारीवरुन (जबाबावरुन) आरोपी विरुध्द कलम ३०२,३२३, ५०४५०६, ३४ भा. द. वि. नुसार देगलूर पो स्टे येथे गुन्हा दाखल झाला सदरिल गुन्हयाचा तपास भगवान मरीबा धबडगे पो निरिक्षक व यांनी पूर्ण करून दोषारोपपत्रमा अति सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल केले.
सरकातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता याचा युक्तिवाद ग्राहय धरुन मा न्यायधीश साहेबांनी दि. ०१/११/२०२३ रोजी वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.
सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पैरवी कर्मचारी पोलीस हेडकॉन्सटेबल माधव गंगाराम पाटील (ब.न. २४२३) पो. स्टे. देगलूर यांनी सहकार्य केले.