सहा पिडीत शिक्षकांना उपोषणापासून परावृत्त व्हावे अशी सुचना
नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुल नांदेडची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी शिक्षण उपसंचालक लातूर विभाग यांना पाठविला आहे. शाळेतील सहा पिडीत शिक्षकांना यामुळे थोडा दिलासा मिळेल असे वाटते.
1 नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक,नांदेड) प्रशांत दिग्रसकर यांनी शिक्षण उपसंचालक लातूर विभाग यांना नागार्जुना पब्लिक स्कुल शाळेची मान्यता काढण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यासाठी संदर्भ गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांचा अहवाल दि.11 जानेवारी 2023, सहा पिडीत शिक्षकांचे पत्र दि.17 ऑगस्ट 2023. जिल्हा परिषद कार्यालयात सुनावणी दि.18 जुलै 2023 तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडील सुनावणी दि.4 सप्टेंबर 2023 असे जोडले आहेत.
नागार्जुना पब्लिक स्कुल या शाळेने शिक्षकांना संस्थेमार्फत अद्याप नियुक्ती आदेशाच्या प्रति प्राप्त झाल्या नाहीत. शिक्षकांना दर महादिलेल्या जाणाऱ्या वेतनाबाबतच्या पावत्या शिक्षकांना दिल्या जात नाहीत. शिक्षकांचे पीएफ नंबरवर संस्थेमार्फत रक्कम जमा होत नसल्याने बहुतांश शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पीएफमध्ये रक्कम जमा करणे थांबविले आहे. त्यामुळे काही जणांचे पीएफ खाते बंद झाले आहे. काही शिक्षकांच्या वेतनाची रक्कम जमा झाल्या बरोबर वेगळ्या सेल्फ चेकद्वारे परस्पर उचलल्या जात होती. तसेच गेल्या 4 ते 6 महिन्यापासून न करता ठरावीक रक्कम शाळेत रोख आणुन देण्यासाठी तगादा लावला आहे. शिक्षक अविनाश चमकुरे यांची चार ते पाच महिन्यापासूनची पगार त्यांच्या वेतनात जमा करण्यात आलेली नाही. त्याबद्दल एक स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यावर त्याबद्दल सुध्दा कार्यवाही करणार आहोत. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतांना शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनाचे 65 टक्के रक्कम वेतन म्हणून मिळाली असेही लिहिले आहे. शिक्षकांना वर्षातील 12 प्रासंगीक रजा (आता सध्या या रजा 20 झालेल्या आहेत) जोडून सुट्टी येत असेल तर त्यांच्या दोन रजा लावण्यात येतात. सहा महिन्यापासून काही कर्मचाऱ्यांची पगार पुर्वीपेक्षा कमी त्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असल्याचे सांगितले याबद्दल मुख्याध्यापकांनी काही एक उत्तर दिलेले नाही.
असे अनेक आरोप करत शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड प्रशांत दिग्रसकर यांनी या शाळेची मान्यता काढण्याची शिफारस केलेली आहे. या अहवालाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड, अध्यक्ष/ सचिव विद्यादिप एज्युकेशनल सोशल ऍन्ड कल्चरल तेलगु सोसायटी नांदेड तसेच मुख्याध्यापक नागार्जुना पब्लिक स्कुल नांदेड आणि तक्रारदार सहा पिडीत शिक्षकांना हे पत्र पाठवून आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे असे नमुद केले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/01/नागार्जुना-पब्लिक-स्कुलस/