सा.बां.चा अधिक्षक अभियंता राजपूत आणि वरिष्ठ लिपीक कंधारे यांना दोन दिवसाचे तुरुंगवास्तव्य

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड सार्वजनिक बांधकाम परिमंडळाचे अधिक्षक अभियंता आणि एक वरिष्ठ लिपीक यांना सध्या तरी दोन दिवस तुरूंगात राहावे लागणार आहे. आज विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविल्यानंतर आलेल्या जामीन अर्जावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला आपले म्हणणे सादर करण्यासाठी 9 नोव्हेंबर अशी तारीख दिली आहे.
1 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिमंडळाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत, वरिष्ठ लिपीक विनोद किशनराव कंधारे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख 40 हजारांची लाच घेतल्यानंतर अटक केली. 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर अशी या दोघांना पोलीस कोठडी मंजुर झाली. आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केली. ती मान्य झाली.
त्यानंतर आरोपी राजपूत व कंधारे यांच्यावतीने जामीन अर्ज वकीलांनी सादर केला. यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला काय सांगायचे आहे अशी विचारणा झाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यासाठी काही वेळ द्यावा असे न्यायालयासमक्ष सांगितल्यानंतर न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर 2023 रोजी सुनिश्चित केली आहे. त्यामुळे गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे यांना दोन दिवस तुरूंगात राहावे लागणार आहे.

सबंधीत बातमी…..

https://vastavnewslive.com/2023/11/02/अधिक्षक-अभियंता-राजपूत-आ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *