नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या एका मुख्याध्यापकाने 25 लाख 84 हजार रुपयांचा अपहार केला अशी तक्रार माळाकोळी पोलीसांनी दाखल करून घेतली आहे.
लोहा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी माणिकराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेबु्रवारी 2019 ते 23 जून 2021 दरम्यान जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माळेगाव (यात्रा) ता.लोहा येथे मुख्याध्यापक असलेले नजीर अहेमद हुसेन तांबोळी साब यांनी एकूण 25 लाख 84 हजार 200 रुपयांची रक्कम उचलून शासकीय पैशांचा अपहार केला आहे. माळाकोळी पोलीसंानी निलंबित असलेल्या मुख्याध्यापक नजीर तांबोळी विरुध्द गुन्हा क्रमांक 118/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 409 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक डोके हे करीत आहेत.
निलंबित मुख्याध्यापकाने 25 लाखापेक्षा जास्तचा अपहार केला