समाजापुढे तयार होणाऱ्या या बाल गुन्हेगारांचा धोका आजच ओळखून रोखण्याची गरज
नांदेड(प्रतिनिधी)-6 नोव्हेंबर रोजी इतवारा हद्दीत, सराफा भागात मारेकऱ्यांच्या मोठ्या जमावाने सागर यादवचा खून केला आणि मोनु यादवला गंभीर जखमी केले. या प्रकरणानंतर समोर आलेले सत्य समाजात भयंकर अस्वास्थ माजवणारे आहे . समाजाने आजच याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यातील जीवनात अनेक कुटूंबांमध्ये गुन्हेगार तयार होतील. याप्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 15 आरोेपींपैकी 6 विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत.
6 नोव्हेंबर रोजी सराफा भागात दुचाकीवर आलेल्या एका मोठ्या जमावाने हत्यारांचे थैला भरून आणला होता. त्याठिकाणी थांबलेल्या दोन चुलत बंधूंवर या जमावाने हल्ला केला. त्यातील एकाने तलवार हाताने पकडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याच्या हातातून तलवार निसटली पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण दुसरा बंधू सागर रौत्रे (यादव) यास हल्लेखोर जमावाने घेरले आणि त्याला खाली पाडून लाथाबुक्यांसह तलवारींनी त्याच्यावर अनेक घाव केले. दवाखान्यात नेण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात इतवारा पोलीसांनी सय्यद अर्सनाल सय्यद अजमद (18), प्रितम सुभाष पवार (़19), संग्राम संजयसिंह परदेशी (23), करमजितसिंग जगबिरसिंग बावरी(19), अंकित राजू कुरील(18), दिगंबर गणेश कपाळे (19), निखील देविसिंह बिडला(18), महाविर परमेश्र्वरसिंह राजपुरोहित(18), विशाल घनशाम रौत्रे(18) या 9 जणांसह 6 विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडले. विधीसंघर्षग्रस्त बालकांची नावे कायद्यातील बंधनामुळे लिहिता येत नाहीत. पण त्या भागात उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज (घटनेच्या काही तासातच ते सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते) पाहिले असता त्यामध्ये प्रत्येक जण पिडीतांना संपविण्यासाठीच आला होता असे दिसते. त्यात विधीसंघर्षग्रस्त बालकेसुध्दा काही कमी नाहीत. ते मोठ्यापेक्षा जास्त जोरात मीच या प्रकरणाचा भाई दिसावा यासाठी धडपड करत होते.
या प्रकरणाची तक्रार देण्यात आली तेंव्हा 23 नावांसह ज्यामध्ये एक नाव दोन वेळा लिहिले आहे. त्यात सगळ्या शेवटच्या 24 व्या रकाण्यात इतर साथीदार असा उल्लेख आहे. त्यात काही विधीसंघर्षग्रस्त बालकांची नावे नाहीत पण पोलीसांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पकडले आहे . समाजाने आता लक्ष देण्याची गरज आहे.पकडलेल्या 15 आरोपींच्या तुलनेत विधीसंघर्षग्रस्त बालकांचा विचार केला तर आज पकडलेले विधीसंघर्षग्रस्त बालक त्या घटनेतील 15 अटक आरोपींमध्ये 40 टक्के वाटा ठेवतात . हे 40 टक्के वाढतच राहिले तर समाजासाठी भविष्यात हा आकडा किती घातक ठरणार आहे हे लिहितांना सुध्दा अंगावर काटा येत आहे.
ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्या ठिकाणी शेकडो लोक आपली दुकाने बंद करून हात बांधून उभी राहुन फक्त घटनाक्रम पाहत आहेत . हा सुध्दा प्रकार समाजासाठी अत्यंत दुर्देवी आहे. दिसत असलेल्या शेकडो लोकांपैकी अर्ध्या लोकांनी जरी फक्त आरडा ओरड केली असती तरी हल्लेखोर पळून गेले असते. सागर यादव हा आपल्याच घरचा युवक आहे ही भावना या शेकडो लोकांमध्ये येण्याची गरज आहे. आपल्या घरच्या व्यक्तीला असा काही प्रकार घडला तर हेच शेकडो लोक म्हणतील आमच्या मदतीला कोणी आले नाहीत. मग तुम्ही कोणाला मदत केली म्हणून लोक तुमच्या मदतीला येतील. हा प्रश्न त्या शेकडो लोकांनी स्वत:ला विचारण्याची गरज आहे.
सीसी टीव्ही फुटेज…
या घटनेमधील अटकेत असलेल्या आरोपींपैकी 40 टक्के आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. ही बालके उद्या काय करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे . आपला मुलगा कोणासोबत फिरतो, काय-काय करतो, कोठे बसतो, त्या ठिकाणी काय-काय घटना घडतात यावर लक्ष देण्याची गरज आई-वडील, नातलग आणि शेजाऱ्यांची आहे. पण ही जबाबदारी कोणीच पुर्ण करत नाही. आपल्याला काय करायचे आहे फक्त हा एक भाव त्या लोकांच्या मनात असतो आणि असे गुपचूप जागी तयार होणारे गुन्हेगार पुढे आपल्याला त्रास देतील याची कल्पना मात्र करत नाहीत. माणसांची अनेक स्वप्ने फक्त लोक काय म्हणतील या विचारामुळे मातीमोल होतात. आता तरी सागर यादवच्या मृत्यूनंतर कमीत-कमी नांदेड जिल्ह्यातील त्याही पेक्षा कमी, नांदेड शहरातील त्याही पेक्षा कमी सराफा भागातील लोकांनी घडलेला वाईट प्रकार हा आमच्याच घरातला आहे असा विचार करून त्या वाईटप्रकाराला समोरे जाण्यासाठी आपली कंबर कसणे गजरेचे आहे.
देशातील प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा सर्व काही शासनाने करावे अशी आहे . सागर यादवच्या मृत्यूचा विचार केला तर पोलीसांवर सर्व वजन टाकून जनता मोकळी होते. उद्या प्रकरणात न्यायालयात साक्षी देण्याची वेळ येईल त्यावेळी अनेक जण फितुर होतात. मग पोलीसांकडून अपेक्षा कशी करता येईल. आपल्या समाजात घडणाऱ्या वाईट वृत्तीला ठेचण्याचे काम आपणच करण्याची गरज आहे. पोलीस अधिकारी तर काही वर्ष राहतील आणि निघून जातील . तयार झालेला तो भयानक राक्षस आम्हालाच त्रास देणार आहे याची जाणीव प्रत्येकाने आपल्या मनात केली तरच अशा घडणाऱ्या घटनांवर काही तरी नियंत्रण येईल.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/11/07/आम्ही-के-बी-गॅंगची-माणसे-आ/