नांदेड(प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे चौकातील पेट्रोलपंप चालकांना 4 जणांनी खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अण्णाभाऊ साठे चौकातील श्रीराम मोटार्स येथे पेट्रोलपंप चालतो. या पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक विश्र्वास गोपाळराव मांगुळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता पेट्रोलपंपावर संतोष उर्फ चिंग्या तरटे (24) रा.बिरसामुंडानगर सांगवी, राहुल काळे (27), प्रदीप उर्फ पप्या गजभारे (25) आणि रामा देवकर(24) सर्व रा.खोब्रागडेनगर नांदेड असे आले आणि या भागात पेट्रोल पंप चालवायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला 10 हजार रुपये द्यावे लागतील. तसेच आम्हाला आता 25 हजार रुपये दे असे सांगितले. मी कशाचे पैसे म्हणालो असता आपल्या कंबरेला लावलेला खंजीर माझ्याकडे उगारुन तुला खुपसून टाकील असे सांगितले. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
पेट्रोलपंप चालकाला खंडणी मागितली