सागर यादव खून प्रकरणात 10 आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-सागर यादवच्या खून प्रकरणातील आरोपींबाबत पोलीसांनी भरपूर मेहनत घेवून ते खरेच विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत काय? याचा शोध घेतला तेंव्हा 6 पैकी 2 विधीसंघर्षग्रस्त बालक 18 वर्ष पुर्ण करणारे निघाले . आज दुपारी इतवारा पोलीसांनी आणलेल्या 11 पैकी 1 जण पुन्हा विधीसंघर्षग्रस्त बालक निघाला. न्यायालयाने उर्वरीत दहा लोकांना 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
6 नोव्हेंबर रोजी इतवारा हद्दीत सागर यादव याचा खून झाला. त्याचा एक भाऊ गंभीर जखमी आहे. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात 23 आरोपींच्या नावासह तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी 15 जणांना अटक केली.  त्यामध्ये सहा विधीसंघर्षग्रस्त बालक होते. परंतू न्यायालयात येईपर्यंत या सहामधील दोन वयस्क झाले. ही सर्व  मेहनत पोलीसांनी केली.पोलीसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या शाळेमध्ये जावून तेथून त्यांचे निर्गमउत्तारे  प्राप्त केले. त्यामुळे ही स्पष्टता झाली. एकाने आपले वय 18 वर्ष पुर्ण सांगितले पण तो नंतर विधीसंघर्षग्रस्त बालक आहे ही बाब न्यायालयासमोर आली.
आज पोलीस निरिक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड आणि अनेक पोलीस अंमलदारांनी या सागर यादव मृत्यू प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले.  त्यामध्ये प्रितम सुभाष पवार (19) रा.बरडशेवाळा ता.हदगाव,   सय्यद अर्सनाल सय्यद अजमल (18)रा.महाराणा प्रताप चौक फारुखनगर नांदेड, संग्राम संजयसिंह परदेशी (23)रा.धोबीगल्ली गाडीपुरा,करमजितसिंग जगबिरसिंग बावरी(19)रा.साईबाबामंदिराजवळ कौठा, अंकित राजू कुरील(18),  दिगंबर गणेश कपाळे (19) , महाविर  परमेश्र्वरसिंह राजपुरोहित(18), विशाल घनशाम रौत्रे(18), किशन राजू कुरील (18) सर्व रा.शनिमंदिराजवळ जुना मोंढा प्रविण गणेशराव पवार(18) बालाजीनगर नांदेड यांचा समावेश आहे.पोलीस तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने 10 जणांना 5 दिवस अर्थात 13  नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधित बातमी ….. 
https://vastavnewslive.com/2023/11/08/सागर-यादवच्या-खून-प्रकरण/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *