सफाई कामगार महिलांना साडी-चोळी वाटप

नांदेड (प्रतिनिधी)– दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे चिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सफाई कामगार महिलांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा खासदार चिखलीकर यांचे खंदे समर्थक क्षितिज जाधव यांच्या वतीने भगीरथ नगर येथील महादेव मंदिरात दिवाळीनिमित्त सफाई कामगार महिलांना साडी चोळी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महिला कामगारांना साडी- चोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी  प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, सचिन उमरेकर, संजय अंभोरे, अमोलसिंग हजारी, गौरव जाधव, व्यंकट गोखले, मनोज जाधव, मंडळ अध्यक्ष पुष्पाताई वानखेडे, सविताताई जाधव, खिलारेताई, कांबळेताई, छाया गायकवाड, अनिता कांबळे, चव्हाणताई आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा चिटणीस क्षितीज जाधव दिवाळी तसेच महापुरुषांच्या जयंती व नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कपाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास वडजे, उत्तम तिडके, विजय जाधव, विनोद पवार, कार्तिक सरोदे, प्रताप पावडे, गणेश शिंदे, विकी चव्हाण, कुणाल सावते, संतोष गवळी, पप्पू कोल्हे, प्रफुल कांबळे, परमजीतसिंग बावरी, विशाल स्वामी, योगेश पुंडगे गोविंद कोंडके, अजय कंधारे, अभिजीत पाईकराव, मयूर गुजरवार, राजू मानेकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *