आता नेत्याचेच चमचे करू लागले पोलीस अधिक्षकांच्या बदलीचा बोभाटा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर आपला पसंतीचा माणुस बसवला नाही तर नांदेडच्या जनतेचे लोकप्रिय नेते आता पोलीस अधिक्षकांचीच बदली करणार असल्याची अफवा नेत्यांचे चमचे पसरवित आहेत .
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत आपल्याच पसंतीचा पोलीस निरिक्षक हवा याचा हट्ट लावून घेणाऱ्या नेत्याने 50 हजार मोदकांचा सौदा केला आहे असे त्यांचेच चमचे सांगतात. त्यातील 10 हजार मोदक अनामत म्हणून घेतले आहेत. याचा अर्थ पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा येथील नियुक्ती आपल्याच माणसाची व्हावी असा ईगो तयार झाला आहे. सध्या स्थानिक गुन्हा शाखेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरिक्षकांनी सुध्दा मॅट न्यायालयात 19 फेबु्रवारी 2023 च्या माझ्या नियुक्ती आदेशात कोणी दखल देवू नये अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र न्यायाधीकरणाकडे (मॅटकडे) दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील तारीख काय आहे हे काही मात्र माहित झाले नाही.
दरम्यान ज्या पोलीस निरिक्षकांनी 50 हजार मोदकांचा वेगवेगळ्या टप्यातील सौदा केल्यानंतर त्यांचेही चमचे आता आमचाच साहेब एलसीबीच्या खुर्चीवर बसणार असे सांगत आहे. तसेच नेत्यांचे चमचे आता तर कोणत्याही परिस्थितीत आमच्या नेत्याने सांगितलेला पोलीस निरिक्षकच स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीचा मालक आहे असे सांगत सुटले आहेत. वास्तव न्युज लाईव्हने जवळपास एका वर्षापुर्वी एक बातमी प्रसिध्द केली होती. ज्यामध्ये आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पसंतीने करावी, वर्ग-1 अधिकाऱ्याची बदली आणि नवीन नियुक्ती खासदारांनी करावी, वर्ग-2 च्या नियुक्त्या आणि बदल्या करण्याचे अधिकार आमदारांना द्यावेत तसेच वर्ग-4 च्या बदल्या आणि नियुक्त्या करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनातील पदाधिकाऱ्यांना द्यावेत असे लिहिले होते . पण त्या बातमीनंतर असा काही प्रकार घडला नाही. आजही आमच्यावतीने केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुखांना विनंती आहे की, या पध्दतीचे नियोजन झाले तर चांगले असेल. कारण त्यामुळे कोणावर अन्याय तर होणार नाही.
सन 2020 मध्ये नांदेड जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला होता. त्यावेळेस सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर आपल्याच पसंतीचा माणुस हवा असा हट्ट लावला होता. तो पोलीस निरिक्षक आता सेवानिवृत्त होण्यासाठी फक्त 16 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यावेळेस सुध्दा पोलीस अधिक्षकांनी आमचे ऐकले नाही म्हणून त्या पोलीस अधिक्षकांची बदली झाली होती. पण ते पोलीस अधिक्षक आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात म्हणाले होते की, मी ताठ मानेनेच नांदेड जिल्ह्यात सेवा दिली आणि ताठ मानेनेच मी नांदेड जिल्ह्याचा प्रभार दुसऱ्या पोलीस अधिक्षकांच्या स्वाधीन करून माझ्या नवीन नियुक्तीकडे जाणार आहे. या शब्दांमध्ये असलेला त्यांचा दम ज्यांनी ओळखला त्यांनी पुन्हा पोलीस अधिक्षकांच्या बदलीचा आग्रह धरुन शिशुपाल आणि श्रीकृष्ण यांच्यात घडलेला घटनाक्रम नक्कीच आठवावा. कारण शिशुपाल श्रीकृष्णांना काय-काय बोलत होते तरी श्रीकृष्ण नेहमी हसत मुखाने शिशुपालाकडे पाहत राहायचे. अनेक लोकांनी श्रीकृष्णांना विचारले की, तो शिशुपाल आपल्यासमोर एवढ्या वाईट शब्दांची वागणुक देतो तुम्ही सर्वशक्तीमान असतांना त्याचे तोंड का बंद करत नाही. तेंव्हाही श्रीकृष्ण फक्त हसले होते. पण शिशुपालाकडे असलेला 100 शब्दांच्या मर्यादेंचा कालखंड पुर्ण होताच 101 क्रमांचा शब्द घश्यातून बाहेर येण्याअगोदर श्रीकृष्णांनी शिशुपालाचा वध केला होता. पौराणीक भाषेत कळले नसेल तर 100 पापांचे घडे भरावे लागतात हे एका वाक्यात सांगता येते.
नांदेडच्या पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात आली. त्यांना सुध्दा कॅट (केंद्रीय प्रशासनीक न्यायाधीकरण) कडे जाण्याचा मार्ग मोकळच आहे. सध्याच्या पोलीस निरिक्षकांनी दाखल केला मॅट कोर्टातील अर्ज अजून निकाल लागलेला नाही. का हट्ट असतो नेत्यांचा की आमच्याच पसंतीचा व्यक्ती एखाद्या विशिष्ट खुर्चीवर बसावा. याच नेत्यांनी मागे 2020 मध्ये निवडणुकीच्या पुर्वी आणलेला एक पोलीस निरिक्षक फक्त 13 दिवसांसाठी त्या खुर्चीवर बसला होता असो असा सर्व ईतिहास असतांना आमचे ऐकले नाही म्हणून पोलीस अधिक्षकांचीच बदली करण्याची तयारी सुरू असल्याचा बोभाटा नेत्याचे चमचेच करत आहेत. समजा पोलीस अधिक्षकांची बदली झालीच तरी त्यांचे पद काही कमी होत नाही. पण वास्तव न्युज लाईव्ह ज्या शब्दात हा सर्व घटनाक्रम मांडत आहे तो सुध्दा जनतेसमोर सत्य आणण्यासाठीच आहे.याचे उत्तर जनतेने काही महिन्यात येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने द्यावे अशी वास्तव न्युज लाईव्हची विनंती जनतेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *