नांदेड(प्रतिनिधी)-संविधानाला मानणाऱ्या पोलीस निरिक्षकाच्या अत्यंत छान मर्यादेत काम करणाऱ्या महिला पोलीस उपनिरिक्षकाला लुटण्यात आल्यानंतर पोलीस विभागाची बदनामी होईल म्हणून त्यांच्या भावाची तक्रार घेवून नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चैन व मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज दोन चोरट्यांनी चोरला आहे.
9 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 10 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेदरम्यान नांदेड जिल्ह्यात संविधानाचे अत्यंत जाणकार आणि मानणारे पोलीस निरिक्षक यांच्या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या महिला पोलीस उपनिरिक्षक आपल्या घराकडे जात असतांना दोन लोकांनी त्यांना अडवले. खंजीरचा धाक दाखवून शिवीगाळ करून त्यांच्याकडील कळ्यात असलेलेली सोन्याची चैन आणि मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज लुटला आहे. 10 नोव्हेंबरच्या रात्री 20.22 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 43 वर पोलीस उपनिरिक्षकांच्या बंधूच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा 812/2023 दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षकाची तक्रार घेतली तर पोलीस दलाची बदनामी होईल म्हणून त्यांच्या बंधूच्या नावाने तक्रार घेण्यात आली आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बालाजी नरवटे हे करीत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेत आलेले नुतन पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्यासाठी सुध्दा हे आव्हानात्मक प्रकरण घडले आहे.
महिला पोलीस उपनिरिक्षकाला लुटले; तक्रार मात्र बंधूची