नांदेड(प्रतिनिधी)-आमदार साहेब आपल्या सोबत झालेल्या चर्चेची पोलीस ठाणे लोहाच्या स्टेशन डायरीमध्ये झालेली नोंद आपण विसलात की काय ? यावर आपले उत्तर येणे अपेक्षीत होते. परंतू अद्याप उत्तर न आल्यामुळे लोहा प्रशासन जिंकले आणि आमदार साहेब हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.
परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेले शामसुंदर शिंदे हे आयएएस अधिकारी आहेत. त्यानंतर ते लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले. त्यांचे बोलणे, त्यांचे वागणे ते आजही आयएएस अधिकाऱ्यांसारखेच आहे. एका प्रकरणात शासकीय विश्रामगृह लोहा येथे आ.शामसुंदर शिंदे आणि लोहा येथील फक्त कायद्याचे भक्त पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेतील शब्द रचना वास्तव न्युज लाईव्हला कळली नाही. परंतू कायद्याला अभिप्रेत दृष्टीनेच आमदार शिंदे बोलले असतील. पण या बोलण्याची नोंद लोहाच्या पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीमध्ये ओमकांत चिंचोळकर यांनी केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावेळी त्या घटनेची बातमी वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केली होती.
आमदार शामसुंदर शिंदे आपल्याबद्दल पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत घेण्यात आलेल्या नोंदीला विसरले आहेत काय? कारण कंधार-लोहा विधानसभा मतदार संघामध्ये आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, त्या नोंदीचे उत्तर आमदारांनी आपल्या पध्दतीप्रमाणे दिले नाही म्हणजे आमदार हारले आणि पोलीस निरिक्षक जिंकले अशी होत आहे.
आमदार साहेब विसरलात काय पोलीस स्टेशन डायरीची नोंद?