नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच विशेष व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळेस आकाशात ड्रोन उडविण्यास 19 नोव्हेंबर रोजी नांदेड शहर आणि माहुर तालुका परिसरात नागरीकांनी, पत्रकारांनी आणि कोणीही व्यक्ती कोणत्याही सबबीखाली नियमानुसार परवानगी घेतल्याशिवाय आकाशामध्ये ड्रोन उडविणार नाही असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुचित केले आहे.
उद्या 19 नोव्हेंबर रोजी कोणी अतिमहत्वाची व्यक्ती नांदेड येवून माहूर तालुक्यात जाणार असल्याने या नांदेड आणि माहूर परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन आकाशात उडविले जाणार नाहीत अशी सुचना पोलीस अधिक्षकांनी जारी केली आहे. या सुचनेचे सर्वांनी तंतो तंत पाल करावे. कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांकडे पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
उद्या आकाशात “ड्रोन’ उडविण्यास बंदी