राज्यातील राजकीय परिस्थितीचा घेतला आढावा

नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय कॉंगे्रस कमिटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी ह्या दि.19 रोज रविवारी नांदेड येथील श्री.गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आल्या असता. त्यांचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तथा माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यासह आदींनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी ह्या नांदेड विमानतळावर तेलंगणा राज्यातील खानापूर आणि आसिफाबाद या विधानसभेच्या प्रचारासाठी जाण्याअगोदर नांदेड विमानतळावर कॉंगे्रस कमिटीने स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, आ.जितेश अंतापूरकर, जिल्हा कॉंगे्रस अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जिल्हा कॉंगे्रस वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मिनल खतगावकर, लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, विठ्ठल पावडे यांच्यासह आदी.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका सुरू असून या ठिकाणी कॉंगे्रस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर अशोकराव चव्हाण आणि माणिराव ठाकरे हे त्यांच्यासोबत तेलंगणा राज्याकडे हेलिकॅप्टरने रवाना झाले.
यावेळी प्रियंका गांधी यांनी सध्या स्थितीतील राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांनी या दौऱ्यात घेतला असल्याची माहिती समोर येते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने काय करता येईल व आपल्याला या ठिकाणी कॉंगे्रसला अधिक मजबुत करण्यासाठी व येणाऱ्या लोकसभेत जास्तीत जास्त कॉंगे्रस उमेदवार विजयी करण्यासाठी काय करता येईल या संदर्भात त्यांनी चव्हाण आणि ठाकरे यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर आगामी काळात महाराष्ट्राच्या राज्याच्याही विधानसभा निवडणुका ह्यज्ञा लोकसभे पाठोपाठ आहेत. यामुळेही या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र निवडणुका लढवून सत्ता मिळवता येईल का? अशीही चर्चा या दौऱ्यादरम्यान झाली असल्याची माहिती समोर येते. यामुळे आगामी विधानसभा कॉंगे्रस पक्ष स्वबळावर लढवेल काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे.