नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाला निवडणुकांच्या काही दिवसांपुर्वी रखडलेल्या पदोन्नत्या देण्याची इच्छा झाली आणि त्यानुसार राज्यातील काही भारतीय पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस अधिक्षकांना अप्पर पोलीस अधिक्षक अशी पदोन्नती देवून नवीन पदस्थापना दिली आहे.या बदल्यांमध्ये भारतीय पोलेस सेवा आणि राज्य पोलीस सेवेचे एकूण 39 अधिकारी आहेत.यानंतर सुध्दा अजून बऱ्याच पदोन्नत्या देणे या शासनाच्या काळात रखडलेलेच आहेत. शासनानेच काही स्थिर नाही त्यामुळे हा पदोन्नतीचा अन्याय शिंदे सरकार आल्यापासून सुरूच आहे.
आज महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अव्वर सचिव दिलीप बोरसे यांच्या स्वाक्षरीने दि.20 नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेले हे पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. त्यात भारतीय पोलीस सेवेतील 2017 च्या बॅचमधील एम.रमेश यांना अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली अशी नियुक्ती दिली आहे. 2018 च्या रितु यांना अपर पोलीस अधिक्षक सांगली अशी पदोन्नती देवून नवीन पदस्थापना दिली आहे.2019च्या तुकडीमधील नित्यानंद झा यांना अपर पोलीस अधिक्षक गोदिंया अशी पदस्थापना देण्यात आली आहे.श्रेणीक दिलीप लोडा यांना राज्यपाल यांचे परिसहाय्यक या पदावर पदोन्नती देतांना पदउन्नत करून देण्यात आले. नांदेड येथील नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन यांना अपर पोलीस अधिक्षक धाराशिव अशी पदोन्नती देण्यात आली आहे. आयुष्य नोपाणी यांना अपर पोलीस अधिक्षक जालना येथे पाठविले आहे. आदित्य धनंजय मिरखेलकर यांना अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण येथे पाठविले आहे. पंकज कुमावत यांना अपर पोलीस अधिक्षक आंबेजोगाई येथे नियुक्ती दिली आहे. ऋषिकेश प्रदीप रावळे यांना अपर पोलीस अधिक्षक सिंधदुर्ग येथे पदोन्नती देवून पदस्थापना दिली आहे.निकेतन बन्सीलाल कदम यांना पदोन्नती देवून पोलीस उपआयुक्त नागपुर शहर येथे पदस्थापना दिली आहे.
भारतीय पोलीस सेवेतील विशाल आनंद सिंगुरी यांना पोलीस अधिक्षक विशेष कृती गट नक्षलविरोधी अभियान नागपूर या पदावरून पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण येथे पाठविले आहे. संजय ए.बारकुंड हे धुळ्याचे पोलीस अधिक्षक आता पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे जाणार आहेत. पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे येथील श्रीकांत धिवरे हे लोहमार्ग पुण्याचे पोलीस अधिक्षक आता धुळ्याचे पोलीस अधिक्षक झाले आहेत. मराठा आंदोलनामुळे अधांतरी ठेवण्यात आलेले जालनाचे पोलीस अधिक्षक तुषार जोशी यांना पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे पाठविले आहे. या यादीत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही.या यादीमध्ये बच्चनसिंह आणि श्रवण दत्त यांच्या वाशिम पोलीस अधिक्षक आणि नागपुर शहर पोलीस उपआयुक्त या पदावरून बदल्या केल्या आहेत पण त्यांना आताही अधांतरीच ठेवले आहे.
भारतीय पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज मिलिंद तारे यांना अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली बदलून पोलीस अधिक्षक वाशिम अशी पदस्थापना दिली आहे. नवनितकुमार कावत अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांना पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती दिली आहे. मोक्षदा पाटील यांना पोलीस अधिक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथून समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई येथे पाठविले आहे.
राज्य पोलीस सेवेतील अपर पोलीस अधिक्षक गोंदिया अशोक बनकर यांना प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे पाठविले आहे. माधुरी केदार (कागणे) ह्या नाशिक ग्रामीण येथील अप्पर पोलीस अधिक्षक आता अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे येथे जाणार आहेत. जळगावचे अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आता प्राचार्य गुप्तचर प्रशिक्षण शाळा नाशिक येथे पाठविले आहे. सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांना बृहन्मुंबई येथे पोलीस उपआयुक्त पदावर पाठविले आहे.अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण शशिकांत सातव यांना पोलीस उपआयुक्त नागपूर शहर येथे पाठविले आहे. प्राचार्य अशोक नखाते यांना अपर पोलीस अधिक्षक जळगाव येथे नियुक्ती दिली आहे. श्रीनिवास घाडगे पोलीस उपआयुक्त पुणे शहर यांना पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नागपुर येथे पाठविले आहे. कविता नेरकर ह्या अपर पोलीस अधिक्षक आंबेजोगाई आहेत त्यांना पोलीस अधिक्षक सायबर महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील दिनेश बारी यांना पोलीस अधिक्षक नागरी दशतवाद विरोधी केंद्र (युसीटीसी) फोर्स-1 मुंबई येथे पाठविले आहे. गणेश शिंदे अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे या पदावरून पोलीस उपआयुक्त अमरावती शहर येथे जाणार आहेत. नागरी हक्क संरक्षण नाशिक येथील पोलीस अधिक्षक विक्रम महादेव साळी हे आता अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण या पदावर नियुक्त झाले आहेत. संभाजी सुदाम कदम पोलीस उपआयुक्त अमरावती शहर यांना आता पोलीस उपआयुक्त पुणे शहर अशी नियुक्ती देण्यात आली आहे.असा हा महाराष्ट्र शासनाचा बदलांचा खेळ. अजूनही पोलीस निरिक्षक ते पोलीस उपअधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक ते पोलीस अधिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक ते पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक ते सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदांच्या भरपूर पदोन्नत्या देणे शिल्लक आहे. महाराष्ट्राचे सरकार कधी या अधिकाऱ्यांना न्याय देईल याचा आज काही एक नेम नाही.
शासनाने जारी केलेल्या या बदल्यांच्या आदेशांच्या चार पीडीएफ फाईल बातमीत जोडले आहेत.