नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री वजिराबाद भागातील चिखलवाडी परिसरात एका 28 वर्षीय युवकाकडून पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आणि लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन गावठी पिस्तुल सहा जिवंत काडतुसे पकडली आहेत.
आजची पहाट होताच एका सर्वोत्कृष्ट पत्रकाराने पुन्हा एकदा व्हाटसऍपवर पकडलेले पिस्तुल आणि काडतुसांची फोटो व्हायरल करतांना एलसीबीच्या पुढची कार्यवाही असे चारच वाक्य जोडले आहेत. हे महान पत्रकार बातमी कोठे छापतात हे मात्र अद्याप कोणालाच माहित नाही. जशी कोणत्याही कार्यवाहीचे चार वाक्य व्हाटसऍप गु्रपला टाकून मोकळे होतात तशी मी या ठिकाणी बातमी छापून आणली म्हणून कधी व्हाटसऍपला छापलेली बातमी टाकत नाहीत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल दि.20 नोव्हेंबरच्या रात्री नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आणि त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील चिखलवाडी परिसरात सुमेर महेशसिंह बैस (28) रा.गाडीपुरा नांदेड यास ताब्यात घेतले.त्याच्याडे दोन गावठी पिस्टल आणि सहा जीवंत काडतुसे सापडली आहेत. नांदेडमध्ये अग्नीशस्त्रांचा वाढता प्रभाव आणि पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी केलेली ही कार्यवाही नक्कीच प्रशंसनिय आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुमेर महेशसिंह बैस विरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये तक्रार दिली आहे आणि त्यास अटक करण्यात आली आहे.
फक्त व्हाटसऍपवर दोन वाक्य लिहुन मी मोठा पत्रकार आहे असे दाखवणाऱ्या या महान पत्रकाराला कोणते पोलीस माहिती देतात याचाही शोध होणे आवश्यक आहे. कारण त्याने स्थानिक गुन्हा शाखेच्या पुढे पाऊल असे शब्द त्यात लिहिले आहेत. उदय खंडेराय स्थानिक गुन्हा शाखेत आल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हचा कोणीही व्यक्ती स्थानिक गुन्हा शाखेच्या रुम नंबर 11 मध्ये गेलेला नाही तरी पण तेथील एका दबंग पोलीसाने उदय खंडेराय यांना ही माहिती दिली की, वास्तव न्युज लाईव्हला त्याला सोडून इतर पोलीस बातम्या पुरवतात. आम्ही आमची पत्रकारीता आमच्याच दमावर सुरू केलेली आहे. आमचे सोर्सेस शोधणे खुप अवघड आहे. कारण या क्षेत्रात आम्ही खूप मेहनत केली आहे.