अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत

नांदेड (जिमाका) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत उमेदवारांना ट्रॅक्टर खरेदीवर ओईएम संस्थेकडून विशेष सवलत देण्यात येत आहे. याबाबतचे प्रस्ताव ओईएम संस्थेने महामंडळास दिले आहेत. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत उमेदवारांना ट्रॅक्टर खरेदीवर ही  विशेष सवलत देण्यात येणार आहे असे महामंळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

या योजनेतर्गत उमेदवार कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करु शकतो. मात्र उमेदवाराला ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक असणारे कर्ज कोणत्याही बँके मार्फतच घ्यावे लागेल. नॉन बॅकींग फायनान्स कॉपोरेशन एनबीएफसी मार्फत मंजूर कर्ज व्याज परताव्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही. तसेच उमेदवाराने ट्रॅक्टर प्रकरणावरील कर्ज हे पात्रता प्रमाणपत्र एलओआय निर्माण केल्याच्या दिनांकानंतरच घेणे अनिवार्य राहील.

कोणत्याही ओइएम संस्थांनी किंवा त्यांच्या डिलर्सने ट्रॅक्टर विक्री करण्यासाठी नकार दिल्यास अथवा अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास, त्वरीत आपल्या जिल्ह्याच्या महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. समन्वयकांच्या संपर्काची यादी www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर उपलब्ध आहे, असे अण्णासाहेब पाटील विकास मागास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *