लोहा येथील पत्रकारांविरुध्द दाखल झालेल्या खंडणी गुन्ह्यातील फिर्यादी सांगतो मी त्या ढाब्याचा मॅनेजरच नाही

पत्रकारांच्या स्वातंत्र्यांवर आली गदा; पत्रकारांनो आता तरी एकजुट दाखवा
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांची नोंद सीसीटीएनएस डायरीत घेतल्यानंतर आता नवीनच प्रकार समोर आला आहे. दोन पत्रकारांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतू या प्रकरणातील फिर्यादीने वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, माझा परमेश्र्वर ढाब्याशी काही एक संबंध नाही. मला बोलावून फिर्याद लिहिलेली होती आणि त्यावर माझी स्वाक्षरी घेतली. मग कोणते खरे ? फिर्याद खरी की फिर्यादी वास्तव न्युज लाईव्हला सांगतो ती घटना खरी? पण या प्रकरणात अटक झालेल्या दोघांचा स्वातंत्र्याचा हक्क हिरावला गेला असे म्हटले तर चुक ठरणार नाही.
दि.23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.18 वाजता डायरी नोंद क्रमांक 33 नुसार फिर्यादी नारायण बळीराम ईबितदार (30) व्यवसाय ढाबा मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोहा येथील पत्रकार गोविंद वड व उत्तम महाबळे या दोघांनी परमेश्र्वर ढाब्याचा मालक मुरली पाटील यांना पुर्वनियोजित कट करून आम्ही पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आहोत, तुमचा ढाबा चांगला चालतो म्हणून ते नेहमी ढाब्यावर जेवण करून जेवणाचे पैसे देत नव्हते. तुमचा ढाबा बेकायदेशीरपणे रात्री उशीरापर्यंत चालतो. तुम्ही आम्हाला आता 60 हजार रुपये द्या, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 30 हजार रुपये द्या नाही तर तुमच्या ढाब्याच्या खोट्या तक्रारी, खोटे निवेदन, खोट्या बातम्या छापून बदनामी करून ढाबा बंद करायला भाग पाडू अशी धमकी फिर्यादीला व ढाबा मालकाला दिली. फिर्यादीच्या मालकाकडून तडजोडी अंती 30 हजार रुपये खंडणी घेवून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 30 हजार रुपयांची मागणी करत असल्याने व फिर्यादीची व ढाबा मालकाची खंडणी देण्याची इच्छा नसल्याने पोलीस स्टेशनला येवून तक्रार देत आहे. वगैरे वरुन पोलीस निरिक्षक चिंचोळकर साहेब यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास पी.एस.आय.सोनकांबळे साहेब यांच्याकडे दिला आहे असे एफआयआरमध्ये लिहिलेले आहे. या फिर्यादीप्रमाणे भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 120(ब), 34 प्रमाणे लोहा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 284/2023 दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार गोविंद वड आणि उत्तम महाबळे यांना अटक करण्यात आली आहे.वृत्तलिहिपर्यंत त्यांना न्यायालयात नेण्यात आले नव्हते. पोलीस अभिलेखात आरोपीचा पुर्व ईतिहास निरंक लिहिलेला आहे.
दरम्यान आज दुपारी 1.40 मिनिटाला मोबाईल क्रमांक 9527772228 वरुन वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकांना फोन आला आणि बोलणारा व्यक्ती सांगत होता की, मी नारायण बळीराम ईबितदार आहे. दाखल झालेला गुन्हा क्रमांक 284 बद्दल मला काही माहिती नाही.फिर्याद अगोदरच लिहिलेली होती. पोलीसांनी मी त्यावर सही न करता बाहेर निघून गेल्याने माझ्या पॅन्टच्या पट्‌ट्याला पकडून मला पुन्हा पोलीस ठाण्यात आणले आणि त्यावर स्वाक्षरी घेतली. मी परमेश्र्वर हॉटेलचा मॅनेजर पण नाही. या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नसतांना माझी तक्रार घेतली आहे. गोविंद वड आणि उत्तम महाबळे यांनी मला पैसे मागितले नाहीत. असे तक्रारीत पण लिहिले आहे की, ढाब्याचे मालक मुरली पाटील यांना खंडणीसाठी धमक्या दिलेल्या आहेत. मग त्यांनी का तक्रार दिली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. आता गुन्हा क्रमांक 284 ची फिर्याद गोत्यात आली आहे. जर ती खरी आहे किंवा वास्तव न्युज लाईव्हला नारायण ईबितदार यांनी सांगितलेली घटना खरी आहे आता याचा शोध कोण घेईल. वास्तव न्युज लाईव्हला सांगितलेली घटना खरी असेल तर पत्रकार गोविंद वड आणि उत्तम महाबळे यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांविरुध्द का कार्यवाही होईल हा प्रश्न समोर आला आहे.
पत्रकारांनो आता तरी एकजुट दाखवा
आज नारायण ईबितदारने हिम्मत करून वास्तव न्युज लाईव्हला सत्य सांगितले गोविंद वड आणि उत्तम महाबळे या दोघांची तर आमची ओळखही नाही. तसेच तक्रारदार ईबितदारची पण ओळख नाही. तक्रारदाराने वास्तव न्युज लाईव्ह हे सत्य मांडते म्हणूनच आम्हाला कॉल करून काही सांगितले त्या आधारावरच ही बातमी आम्ही लिहिली आहे. प्रश्न आज महाबळे आणि वडचा नाही तर पत्रकारीतेवर आणल्या जाणाऱ्या दबावाचा आहे. कोणी एक दोन मोदक दिले तर त्याच्या नाही त्या बातम्या आठ-आठ कॉलम छापता. आता तरी वड आणि महाबळेवर आलेल्या प्रकाराची दखल जिल्हा मराठी पत्रकार संघाने तरी घ्यावी जेणे करून पत्रकारांची एकजुट दिसेल नाही. नाही तर पत्रकारांची अवस्था भविष्यात किती वाईट होईल याचा विचार तरी करा. यासंबंधीचा ईबितदार यांनी आम्हाला केलेला कॉल ऐकायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ईबितदार बोलतात त्यांच्या बोलण्यातील भिती सुध्दा त्या ऑडीओमध्ये जाणवते. म्हणजे नांदेड जिल्ह्यात काय चालले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *