
लोहा, (प्रतिनिधी)-लोहा शहरातील अवैध गुडगुडीचे अड्डे बंद करण्यानची लोहा येथील सामाजिक आंबेडकरी कार्यकर्त्याची तशिलदार लोहा यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुढे निवेदात असे नमुद केले की, लोहा येथे नव्याने अवैध गुडगुडी जुगाराचे आड्डे सुरू झाले असुन हा गुडगुडी जुगार हा फार संवेदनशील आहे .
लोहा शहरातील नागरिकांची काही देणे घेणे नही वसुली अधिकारी आणून तालुक्यातील युवकांना हाताला रोजगार नाहीतर नाही मात्र त्या युवकांना व्यसनाधीन करण्याचे पाप या मंडळी कोण होत आहे.या गुडगुडी जुगारामुळे चार वर्षा पूर्वी अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासुन मुकले आहेत अनेकांनी आत्महत्या केली आहे.अनेकजण देणे झाले म्हणून गाव सोडून गेलेआहेत. या अवैध गुडगुडी जुगाराकडे अनेक गोरगरीब ,युवक,शेतकरी, छोटे – व्यापारी हे भरकट आहे .
शहरातील गाडीवाले ,फळ विक्रेते, मोटर सायकल यावर कारवाई करून आपली पाठ स्वतः थोपटून घेणारे अधिकारी शहरातील अवैध व्यवसायाला बळ देत आहेत शहरात गुटखा ,मटका, अवैध वाळू, आणि आता चार शहरात गुडगुडी सुरू झाली तेव्हा अशा अधिकाऱ्याची तात्काळ उचल बांगडी करावे अन्यथा पी आय हटाव असे आंदोलन शहराच्या वतीने तात्काळ करण्यात येणार आहे.
तेव्हा प्रशासाने तात्काळ जातीने लक्ष देऊन लोहा शहरातील अवैध गुडगुडी जुगार कडे जिल्हा पोलीस प्रशासाने लक्ष देऊन गुडगुडीचे जुगार अड्डे बंद करावेत अशी मागणी समस्त आंबेडकर जनतेने तहसीलदार लोहा यांच्यामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे. या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते नगरसेवक बबनराव निर्मले, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गंगाधर महाबळे, भारिपचे तालुकाध्यक्ष बालाजी खिल्लारे, रिपब्लिक सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल दादा गायकवाड, हनुमंत कंधारे लालसेना जिल्हाध्यक्ष, जयपाल पांडुरंग महाबळे, ऋषिकेश देविदास महाबळे, रवी उत्तम जोंधळे, शरद चंद्र कापुरे, नामदेव बुध्दे, तुळशीराम पाटील लुंगारे भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र सचिव, रंगनाथ रानबा आढाव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.