अत्यंत छोट्याशा साखराळे तालुका वाळवा जि.सांगली येथे जन्मलेले सुरज गुरव यांनी ईतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच पत्रकारीतेच्या विषयात सुध्दा त्यांनी एम.जे.ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. आपल्या जीवनात स्वप्ने छोटी नसावीत या मानसिकतेनेच तरुण वयात तयारी केल्याने त्यांनी 2009 मध्ये पोलीस दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवला. आपण या जगात कोणाचे मनोरंजन करण्यासाठी जन्मलो नाहीत हे लक्षात ठेवून आपल्या जीवनाचे वास्तुशिल्प आपल्याला स्वत:च तयार करायचे आहेत. या भावनेने मार्गक्रमण सुरू केले. अशा या दणकट विचार शक्तीच्या पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांना शब्दसुमनांनी जन्मदिनाच्या शुभकामना…
सुरज गुरव यांनी आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना सर्वात आवडणारे काम म्हणजे गड भ्रमण पोलीस दलात प्रवेश केल्यानंतर सुरज गुरव यांच्या जीवनात संस्कृतीची जोड झाली आणि या जोडीतून रुद्र आणि सई या दोन फुलांनी त्यांच्या कुटूंबाला सुगंधीत केले. आपल्या जीवनात पोलीस दलाच्या कामाची कोणतीही जबाबदारी न झटकता आपल्या छंदांना त्यांनी भरपूर वाव दिला. त्यांनी महाराष्ट्रातील 210 किल्यांना भेट दिली. नुसती भेटच दिली नाही तर त्या किल्याच्या प्रत्येक जागेचा ईतिहास जाणून घेतला. तसेच महाराष्ट्राबाहेरच्या 60 किल्लांवर भ्रमंती केली. या भ्रमंतीमध्ये आपल्या ईतिहास या विषयाला जोडून जवळपास 40 संदर्भग्रंथांचा अभ्यास केला. ज्यामधून आपल्या राज्यातील गड आणि राज्याबाहेरील गड किल्ले यांचा सखोल अभ्यास केला. या सखोल अभ्यासाच्या बळावर त्यांनी माझं गडप्रेम हे पुस्तक लिहिल आणि त्याद्वारे आपली एक वेगळी ओळख तयार केली. ही ओळख तयार करतांना त्यांच्या सौभाग्यवती संस्कृती आणि बालके रुद्र आणि सई यांच्यासह त्यांच्या अनेक मित्रांनी या गड भ्रमंतीमध्ये त्यांना साथ दिली. अशा पध्दतीने आपल्या आयुष्यात पोलीस नोकरी, कुटूंब आणि मित्र परिवार यांच्यामध्ये तडजोड आणि कसरतीच्या जोरावर आयुष्य उभा केल आणि या आयुष्यात कुठे काही व्रण लागलाच तर त्या व्रणावर जिद्दीने टाके घालण्यासाठी संयमाचा धागा आणि नम्रतेची सुई जपण्याची कला सुरज गुरव यांनी अवगत केली आणि त्या आधारावर हळूहळू आपल्या जीवनाचे मार्गक्रमण करत असतांना आज ते नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक आहेत. या पुर्वी त्यांनी जळगाव, कोल्हापूर, चिपळूण, कराड या ठिकाणी पोलीस उपअधिक्षक या पदावर आपल्या सेवा राज्याला दिल्या. पुढे पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस अधिक्षक या पदावर काम करत असतांना त्यांची नवीन नियुक्ती नांदेड शहर उपविभाग येथे झाली.

वरिष्ठ अधिकारी, जनता, पत्रकार यांच्याशी संपर्क साधतांना, त्यांच्यासोबत विचारांची आदान प्रदान करतांना सुरज गुरव यांना एम.जे.चे.शिक्षण तेवढेच मदत करणारे ठरले आणि त्यांनी यापरिस्थितीत आपल्यातील सर्व कसबांचा उपयोग करत आपल्या जीवनाला दिलेली धार ही महत्वपुर्ण आहे. त्यांच्याकडे असलेली धार मात्र त्यांनी समाजाच्या भल्यासाठीच वापरली. जगदीश खेबुडकर ह्या गितकारांनी एका पत्रकाराच्या दैनंदिन डायरीवर लिहिलेले शब्द असे आहेत की, पत्रकाराची लेखणी े दुधारी लागू नये कोणाच्या जिव्हारी. परंतू या शब्दांना कोणाच्या जिव्हारी लागतील अशी कृती सुरज गुरव यांच्या जिवनातून आम्हाला दिसली नाही. आपल्या समोरच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांनी पुन्हा हे अधिकारी आपल्या समक्ष येणार नाहीत याचे लक्ष ठेवले. कारण त्यांना कळत की, आपल्या सहकाऱ्यांच्या आरोग्यासाठी औषध देणेच गरजेचे नाही तर फक्त त्यांची विचारपुस सुध्दा त्यांच्यासाठी औषधाचे काम करते.
नांदेडमध्ये त्यांनी मकोका कायद्याच्या बऱ्याच प्रकरणांची हाताळणी केली.त्या प्रकरणांचा अंतिम निर्णय यायला वेळ लागेल.बहुदा तोपर्यंत सुरज गुरव नियमित अपर पोलीस अधिक्षक हे पद धारण करतील. त्यांना त्यासाठी सुध्दा शुभकामना.चांगले कुटूंब आणि जीवाला जीव देणारे मित्र यांचा मोठा साठा सुरज गुरव यांच्याकडे आहे. या दोन्ही बाबी मिळणे म्हणजे सुरज गुरव यांना जीवंतपणीच स्वर्ग मिळालेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या जीवनातील संस्कारांच्या आधारावर त्यांनी चालाखी आणि ईमानदारी या दोन शब्दांना रंगतांना त्यांनी ईमानदारीला महत्व दिली कारण ती ईमानदारी जन्मभर टिकणारी असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ सापडतो. परंतू जिवनाचा अर्थ जीवन जगल्यानंतरच मिळतो. हे शिकायचे असेल तर सुरज गुरव यांच्याकडे पाहायला हवे. नाव आणि ओळख छोटीशी का असेना परंतू ती स्वता:शी असावी या पध्दतीने जगणाऱ्या सुरज गुरव यांनी सर्वांचा सन्मान तर केलाच परंतू आपल्या स्वत:च्या आत्मसन्मानासह जगून स्वत:ची ओळख बनवली. अशा या भारदस्त व्यक्तीमत्वाला जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा…
