नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील बसस्थानकाला विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांचे नाव देण्यात यावे असे निवेदन भाजपा मंडळाध्यक्ष आशिषसिंह ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विभाग नियंत्रक नांदेड यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदार यांना सुध्दा देण्यात आल्या आहेत.
नांदेड येथील बसस्थानकाला विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांचे नावे देण्यात यावे त्यामुळे युवकांना त्या नावाने प्रेरणा मिळेल. विर विरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांचा ईतिहास पाहिला असता महाराणा उदयसिंहजी यांच्या मृत्यूनंतर 1540 मध्ये मेवाडचे राजे विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी गादीवर विराजमान झाले. आपल्या कार्यकाळात अकबर, खिलजी, पठाण यांच्यासारख्या अनेक मुगल सरदारांना महाराणांनी संघर्ष देवून भारतीयांना पहिले स्वातंत्र्य मिळवून दिले. बापा रावल, दुर्गादासजी राठोड, महाराणा संग्रामसिंह, पृथ्वीराज चव्हाण या शुरविरांचा ईतिहास ऐकल्यानंतर अंगावर काटे येतात. नांदेडच्या बसस्थानकाला विर शिरोमणी हिंदु कुलभूषण महाराणा प्रतापसिंहजी यांचे नाव द्यावे जेणे करून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना महाराणांचे नाव वाचून त्यांच्या जीवनावर प्रकाश पडेल.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अदित पवार, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिले आहे. निवेदन देतांना आशिषसिंह रामसिंह ठाकूर, लव राठोड, बंटी परमार, रोहित कौशीक, शैलेश शर्मा, अक्षय राठोड, भारत ठाकूर, विक्रम ठाकूर, गजाननसिंह चंदेल, सागर परमार, साई गहलोत, मयुर विधानकर, गणेश बोरकर आदींची उपस्थिती होती.
नांदेड बसस्थानकाला विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजींचे नाव द्यावे-निवेदन