नांदेड(प्रतिनिधी)- अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षा निमित्त लोकोत्सव साजरा करण्यासाठी लोकोत्सव समितीची बैठक दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ सोमवार रोजी विकास नगर जुना कौठा येथील बालाजी मंदिरात संपन्न झाली.
अनेक शतकांच्या प्रतिक्षे नंतर प्रभु श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत निर्माण होत असून तेथे प्रभू श्री रामचंद्रजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्या निमित्त घरोघरी संपर्क करून अयोध्येहून आलेल्या अक्षता , प्रतिमा वितरण दिनांक ०१ ते १५ जानेवारी या कालावधीत करणे व दिनांक २२ जानेवारी रोजी दीपोत्सव तथा आनंदोत्सवाचे नियोजन करणे त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२३ मधे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षा निमित्त गृहसंपर्क अभियान राबविणे या संदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अनेक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.