नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिका, प्रज्ञा जागृती मिशन आणि यादव महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते प्रज्ञा जागृती मिशनचे संस्थापक अध्यक्ष भानुदासजी यादव यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून 28 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून “यदुकुल’ यादव अहिर मंडळ स्व.बालाराम यादवनगर वजिराबाद येथे 18 वर्षावरील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण (पहिला आणि दुसरा डोस) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरातील जास्त-जास्त नागरीकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे या धोरणाअंतर्गत 28 जुलै रोजीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 जुलै रोजी लसीकरण करून घेणाऱ्यांना पुर्व नोंदणीची गरज नाही. पण लसीकरण करण्यासाठी येतांना स्वत:चे आधार कार्ड सोबत आणावे असे संयोजक डॉ.कैलाश यादव यांनी कळवले आहे.
यादव समाजातील भानुदासजी यादव यांचे मागील वर्षी कोरोना आजाराने निधन झाले होते. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या भानुदास यादव यांच्या पुण्यतिथी दिनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हीच त्यांना खरी श्रध्दांजली आहे असे वक्तव्य मुंबई महानगर न्यायाधीश गजानन यादव, राष्ट्रीय महासचिव यादव महासभा भिषण यादव यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी किशोर यादव, धिरज यादव, गगन यादव, पवन गुरखुद्दे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरण शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन कैलाश यादव, भारत यादव, राज यादव, गोकुळ यादव, दिपक यादव, सुशांत यादव यांनी केले आहे. लसीकरणाच्यावेळी डॉ.संतोष यादव आणि डॉ.किरण यादव हे उपस्थित राहतील आणि लस घेतलेल्या लोकांची देखरेख करतील.
28 जुलै रोजी वजिराबादच्या ‘यदुकुल’ मध्ये कोरोना लसीकरण शिबिर