नांदेड ()- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जवळपास पस्तीस कलावंतांचा संच घेऊन तन्मय ग्रुप नांदेड या संस्थेने कथा मुक्तीच्या व्यथा मातीच्या या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यावर आधारित नाटक सादर केले. नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित हे नाटक गाव वाड्यावरचे, वस्ती तांड्यावरचे ते अनामिक स्वतंत्र सैनिक ज्यांचे योगदान अमूल्य आहे त्यात सांडू वाघ, दगडाबाई शेळके अश्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी लढा दिला त्यांची आठवण करण्याचा प्रयत्न हे नाटक करते. स्वामी रामानंद्तीर्थ ह्यांनी हे आंदोलन उभे केले तर गोविंद पानसरे यांच्या आत्मबलिदानाणे हे आंदोलन मराठ्वाध्याच्या कणा कानापर्यंत पोहचले. मनामनात पेटले हे ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न हे नाटक करते.
या नाटकात अभिजित बारडकर, विश्वास आंबेकर, आशिष पांचाळ, दिव्या शेळके, संजना हनुमंते, रमेश पतंगे, नागेश लोकरे, गिरीष राघोजीवार, आदित्य उदावंत, मिथिलेश देशपांडे, दीक्षा कुरुडे, रोहन कदम, विक्रम व्यास, वैभव देशमुख, श्वेता सौदे, गोविंदराव काळम, हर्षवर्धन काळम, श्रेयस यादव, अलोक सौदे, आनंदराव कांबळे, आकाश हटकर, श्यामसुंदर चिंतलवार, श्रुती माकणे, मानसी चौधरी, संजीवनी शिंदे, स्वर्णिम नेरळकर, श्रीगणेश हंबर्डे, प्रसन्न सोनटक्के, वैष्णवी जाधव, भारती नवादे, नाथा चितळे, नितीश देशपांडे यांनी भूमिका साकारल्या. तर प्रकाशयोजना- चैतन ढवळे, नेपथ्य- आकाश हटकर आणि आशिष पांचाळ, पार्श्वसंगीत- प्रणव चौसाळकर आणि अमोल लाकडे, रंगभूषा व वेशभूषा- गजश्वीनी देलमाडे यांनी साकारली.
काही दिवसांपूर्वी गाथा मुक्तीसंग्रामाची हे मराठवाडा मुक्ती संग्रामावरील नाटक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने मराठवाड्यातील विविध ठिकाणी प्रयोग सादर करण्यात आले नांदेड येथे या प्रयोगांची धुरा नाथा चितळे यांनी सांभाळली होती आणि त्याच विषयावरील नाट्य प्रयोग स्पर्धेनिमित्त नांदेडकर रसिक प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आले .