नांदेड,(प्रतिनिधी)- सामान्य नागरिकांशी संबंध ठेवताना पोलिसांकडून त्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन का होते, त्याचे परिणाम कशाप्रकारे कमी करता येऊ शकतात या विषयावर आज नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस परीक्षेत्रातील पोलीस स्पर्धकांनी भाग घेऊन ही वादविवाद स्पर्धा संपन्न झाली.
आज दिनांक 6 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नांदेड,हिंगोली, लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील पोलीस स्पर्धकांनी भाग घेतला. या वादविवाद स्पर्धेचा विषय सामान्य नागरिकांशी संबंध ठेवताना पोलिसांकडून त्यांच्या मानव अधिकाराचे उल्लंघन का होते त्याचे परिणाम कशा प्रकारे कमी करू शकता येतात हा होता. या स्पर्धेमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कत्,ते पोलीस अंमलदार बालाजी कळकेकर लिंबगाव, मंगेश भरत मुळे शिवाजीनगर लातूर, परमेश्वर बाबुराव अभंगे वाचक शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर, अजय पंडित पोलीस ठाणे वसमत ग्रामीण, महिला पोलीस अंमलदार विजया कुलकर्णी जिल्हा विशेष शाखा हिंगोली यांनी आपले विचार मांडले
या स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी गृह पोलीस उप अधीक्षक जगदीश भंडरवार यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून साईनाथ नागोराव कांडले, दत्ता नागोराव बारसे महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा हिंगोली जिल्हा विशेष शाखेच्या पोलिस अंमलदार विजया कुलकर्णी यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल एकनाथराव कत्ते पोलीस मुख्यालय नांदेड यांना मिळाला, तृतीय क्रमांक पोलीस अंमलदार अजय पंडित पोलीस ठाणे वसमत ग्रामीण यांना प्राप्त झाला. प्रथम आणि द्वितीय ठिकाणी आपले नाव नमूद करणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गृह पोलीस उप अधीक्षक जगदीश भंडरवार यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांकरिता शुभकामना दिल्या आहेत.