नांदेड(प्रतिनिधी)- जुन्या नांदेड भागातील वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आज कॉंगे्रसचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अब्दुल शमीम अब्दुला यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
कॉंगे्रस कमिटीचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अब्दुल शमीम अब्दुला यांनी त्यांचे सहकारी अब्दुल सत्तार अब्दुल गफुर, शबाना बेगम मोहम्मद नासेर, अब्दुल लतिफ अब्दुल अमजद, चॉंद पाशा कुरेशी, सय्यद शोयब, अब्दुल हफिज, रजिया बेगम, अब्दुल रशीद अब्दुल गणी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन दिले आहे. जुन्या नांदेड शहरामधील देगलूर नाका परिसरात आणि जुन्या नांदेडच्या संपूर्ण भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. दोन दिवसांत बकरी ईद हा सण येत आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरीकांची तारांबळ होत आहे. जुन्या नांदेड शहरामध्ये उदभवणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या तात्काळ दुरूस्त करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.