नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील सुकळी वीर ता.कळ मनुरी येथील प्रतिष्ठित नागरिक, डोंगरकडा कारखान्याचे निवृत्त सुरक्षा अधिकारी रामचंद्र छापरवाल यांचे अल्पशा आजाराने दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले,सूना, २ मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ते नामवंत पहिलवान होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुकळी वीर ता.कलमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नांदेडचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संदीप छापरवाल यांचे ते वडील होत.
Related Posts
साप्ताहिक पेपर नांदेड पुकारची मान्यता रद्द करा-निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)-साप्ताहिक पेपर असतांना शेख याहिया शेख इसाकने सलग दोन दिवस पेपर छापून नियमांची पायमल्ली केली आणि त्यातून माझी बदनामी केली…
असहकार आंदोलन करणाऱ्या जवळपास 40 ग्रामसेवकांचे निलंबन
नांदेड(प्रतिनिधी)-असहकार आंदोलन करून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाठ्यांनी सेवा शिस्त व अपील नियमांचा भंग केला. म्हणून त्या सर्व जवळपास 40…
लोहा येथे घरफोडून 4 लाख 97 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 96 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड शहरातील भाग्यनगर-2, वजिराबाद-1 इतवारा-1,शिवाजीनगर-1…